षटकार मारत उघडले खाते
भारतीय कर्णधार रोहित शर्माने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच षटकात षटकार मारून आपले खाते उघडले. त्याने पहिले ५ चेंडू काळजीपूर्वक पाहिले आणि नंतर शेवटचा चेंडू त्याने थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. हा चेंडू हवेत उसळला आणि त्यावर रोहितने षटकार मारला ज्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजासह कर्णधाराचा चेहराही बघण्यासारखा झाला होता. एकदिवसीय सामन्यात शाहीनच्या पहिल्याच षटकात षटकार मारणारा रोहित जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बड्या बड्या फलंदाजांना शाहीनसमोर गुडघे टेकताना पाहिलं आहे. पण रोहितने मात्र त्याच्या पहिल्याच षटकात षटकार ठोकला. इतकेच नाही तर रोहितने शादाब खानच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आपले शानदार अर्धशतक पूर्ण केले आहे. रोहितने ४२ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले.
सध्याच्या घडीला भारताचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात कायम आहेत. या दोघांनीही आपले शानदार अर्धशतक झळकावले आहे. सोबतच आपली १०० अधिक धावांची भागीदारीही पूर्ण केली आहे. शुभमन गिलने तर शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर शानदार चौकार मारत त्याला पार जेरीस आणले आहे.