पुणे: कौटुंबिक वादातून ओैषधी गोळीतून महिलेला ब्लेड देऊन तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे.
सोमनाथ साधू सपकाळ (वय ४५, रा. उत्तमनगर) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.

याबाबत छाया सोमनाथ सपकाळ (वय ४२) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोमनाथ याच्या विरुद्ध खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ पत्नी छाया यांच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. काही महिन्यांपूर्वी सोमनाथचा भाऊ घरी दारु प्यायला आला होता. त्यावेळी छायाने सोमनाथशी वाद घालून त्याला घरी दारु प्यायला बोलावू नका, असे सांगितले होते. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता.

सोमनाथने औषधी गोळ्यात ब्लेड टाकून त्या गोळ्या पत्नी छाया यांना दिल्या. ब्लेड गिळाल्याने त्यांना त्रास झाला. त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पत्नाीचा शारिरिक आणि मानसिक छळ करणे, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथला अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

जुन्या भांडणाचा राग, मित्रावर वार; डोक्यात दगड घालून संपवलं, नाशकात हत्येची हादरवणारी घटना
Read Latest Maharashtra News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *