बँकेतून जास्त आलेले पैसे केले परत; आडत व्यापाऱ्याचा प्रामाणिकपणा:पातूर येथील ‘बुलडाणा अर्बन’मधील घटना; कर्मचाऱ्यांनी मानले आभार
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत व्यापारी ज्ञानेश्वर गोमासे यांनी प्रामाणिकपणाचा प्रत्यय देत बँकेकडून शिल्लक आलेले पैसे परत केले. पातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्ञानेश्वर गोमासे यांची धान्याची अडत असून, दर शनिवारी पातूर येथील बाजार समितीत आठवडी बाजार भरत असल्याने शुक्रवारी त्यांनी बुलडाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी पातूरमधून विड्रॉल केला. विड्रॉल करत असताना बुलडाणा अर्बन सोसायटीच्या कर्मचाऱ्याच्या नजरचुकीने ज्ञानेश्वर गोमासे यांना साडेसात हजार रुपये जास्त गेले. घरी आल्यानंतर गोमासे यांनी पैशाची मोजणी केली असता त्यांना साडेसात हजार रुपये जास्त भरल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने दुपारी बुलडाणा अर्बन सोसायटीच्या मॅनेजरसोबत संपर्क करून आपल्याला शिल्लक पैसे आल्याचे सांगितले व दुपारी त्यांनी पैसे सोसायटीला परत केले. बँकेला पैसे परत केल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त करून अशा ग्राहकांची आम्हाला गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक अमोल अग्रवालसह व्यवस्थापक चंद्रकांत जावडे, बँक कर्मचारी राजेंद्र ताले, दत्तात्रय लादे, रूपाली राहूळकर, दिनेश राठोड, अभिजीत पैठणकर यांच्यासह मोहन जोशी, दीपक पाठक, विशाल वाडी, उमेश देशमुख आदी उपस्थित होते.