नववसाहतीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर:नवीन जलवाहिनीसाठी विधाते मळ्यातील महिलांचे आंदाेलन
सातपूर विधाते मळा नववसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दीड वर्षापासून मोठ्या व्यासाची पाइपलाइन नसल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांना पुरुष मंडळी कामासाठी बाहेर पडल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठीचा वनवणं फिरावे लागत आहे. नववसाहतींमध्ये त्वरित मोठ्या व्यासाची पाइपलाइन मंजूर करत प्रश्न सोडवावा, अशी मागणी महिलावर्ग करत आहेत. यासाठी महिलांनी हंडा हाती घेत आंदोलन केले. सातपूर लिंक रोडवरील शिव रस्त्यावर असलेल्याविधाते मळ्यात दीड वर्षापूर्वी मोठयाव्यासाची पाण्याची पाइपलाइनटाकण्यात यावी याबाबत अर्ज निवेदनदेण्यात आले होते व त्या बाबतीतआदेशही देण्यात आले. मात्र दीडवर्षानंतर या ठिकाणी पाइपलाइन टाकलीनाही. उपलब्ध पाइपलाइनवर पाणी योग्यदाबाने येत नसल्याने महिलांना पिण्याच्यापाण्यासाठी वनवन भटकावे लागतआहे. घरातली कामे आटपून अर्धाकिलोेमीटरचे अंतर कापत कळशी, हंडेघेऊन पाणी आणावे लागत आहे. सर्वमंजुरी टॅक्स घेत नववसाहतबनल्यावरही पाण्याची पाइपलाइन टाकतनसल्याने महिला नागरिकांना मोठा त्राससहन करावा लागत आहे. या बाबतीतप्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणीसमाजिक कार्यकर्त्या माधुरी बोलकरयांनी केली आहे. मानदुखीचा आजार जडला ^दूरवरून हंडे, कळशीने पाणी आणावे लागत आहे.अनेकदा चक्कर येते. कंबरदुखी, मानदुखी आणि पाठदुखी तर नित्याचीच झाली आहे. – कविता पाटील, रहिवासी दूषित पाण्याने आजार ^बोअरवेलच्या पाण्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. दूषित पाण्यामुळे आजार वाढले आहेत. – हिरा गणपत उघडे, रहिवासी