मोदी ज्या-ज्या ठिकाणी हात लावतात त्याची माती होते:मालवण मधील घटनेवरुन राऊत यांचा घणाघात; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
‘हात लावील तिथे सोने होते’ अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या-ज्या ठिकाणी हात लावतात त्याची माती होते, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. अयोध्यातील राम मंदिराचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले, त्यातून आता पाणी गळत आहे. नव्या संसदेचे उद्घाटन मोदींनी केले, तेथे देखील पाणी गळत आहे. अनेक पुलांचे उद्घाटन त्यांनी केले, ते पुल पडत आहेत. कोस्टल रोडचे उद्घाटन केले, तो गळत आहे. अटल सेतू मध्ये दरार पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले, तो पुतळा कोसळला आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मोदी हात लावतात त्याची माती होत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. तो आमच्या मनावरील आघात कधीही भरला जाऊ शकत नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे घाई घाईत अनावरण केले होते. इतक्या घाईत या पुतळ्याचे अनावरण करू नका, असे आधीच सांगण्यात आले होते. मात्र तरीही त्यांनी घाईने पुतळ्याचे अनावरण केले. इतकंच नाही तर त्या पुतळ्याच्या बांधकामाविषयी आणि शिल्पकलेविषयी अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला होता. त्यात इंद्रजीत सावंत यांचा देखील समावेश होता. स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी देखील त्याच्यावर काही आक्षेप घेतले होते. तरीही तो पुतळा घाईघाईने बसवण्यात आला. आता तो पुतळा कोसळला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा असा कधीही अपमान झाला नसल्याचे ते म्हणाले. औरंगजेब आणि मोगल राजांनी देखील आमच्यावर अनेक हल्ले केले. मात्र, छत्रपतींचा असा अपमान मुघल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनीही केला नव्हता. आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानाने सुटून आले. मात्र, आपल्याच राज्यात कोसळून पडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र, मोदी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार असल्याचा आरोपही खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम केले आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मर्जीतला ठेकेदारांना हे काम नेहमीप्रमाणे देण्यात आले. त्यामुळे याच्यात किती कमिशन मिळाले, याचा हिशोब द्यावा लागणार आहे. ठेकेदार, शिल्पकार हे सर्व ठाण्यातले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या मागचे कारण काहीही सांगत असतील. मात्र, आज महाराष्ट्र दुःखी आहे. महाराष्ट्राच्या छातीमध्ये आरपार वेदना होत आहेत. त्याची भरपाई कधीही करू शकत नसल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. गिरगाव चौपाटीवरील टिळकांच्या पुतळ्याचे उदाहरण महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे होताना मी पाहिले, तशी वेळ महाराष्ट्रावर कधी येईल, असे कधीही वाटले नव्हते. मात्र सरकार अजूनही हसत आहे. सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना दिसत नाही. सरकार समुद्रावर जोराचा वारा असल्याचे कारण देत आहे. मात्र समुद्रावर आणि किल्ल्यांवर वारा असणारच. 1933 साली गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला, तो अजूनही तसाच आहे. तिथेही तोच वारा, त्याच वेगाने वाहत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 1956 साली पंडित नेहरूंनी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. त्या किल्ल्यावर देखील मोठ्या प्रमाणात हवा आहे. मात्र, तो पुतळा देखील अजून कायम असल्याचे राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा – राऊत महायुती सरकारने चांगल्या मनाने पुतळा उभारला नाही, त्यामुळे मी सर्वात आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच रवींद्र चव्हाण यांना बरखास्त करायला हवे, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील यांनी सोडले नाही. या कामात देखील त्यांनी लाखो, कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाही ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करत आहेत. याच्यावर महाराष्ट्र शांत बसणार नाही. यावर महाविकास आघाडी गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती राऊत यांनी दिली. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… बदलापूरची घटना ताजी असताना रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर जंगलात बलात्कार:ऑटोचालकाचे कुकृत्य; नागरिक संतप्त बदलापूर येथील घटना ताजी असताना रत्नागिरीमध्ये आणखी एका लाडक्या बहिणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्नागिरी शहरात राहणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थिंनीवर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याचे समोर आल्यानंतर रत्नागिरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच पोलिस निरीक्षकांना देखील घेराव घालण्यात आला. आरोपीला पकडा आणि त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी संतप्त नागरिकांनी यावेळी केली. लाखो रुपये खर्च करून शहरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मात्र ते बंद आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासन तोंडघशी पडले असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा…
’हात लावील तिथे सोने होते’ अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या-ज्या ठिकाणी हात लावतात त्याची माती होते, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. अयोध्यातील राम मंदिराचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले, त्यातून आता पाणी गळत आहे. नव्या संसदेचे उद्घाटन मोदींनी केले, तेथे देखील पाणी गळत आहे. अनेक पुलांचे उद्घाटन त्यांनी केले, ते पुल पडत आहेत. कोस्टल रोडचे उद्घाटन केले, तो गळत आहे. अटल सेतू मध्ये दरार पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले, तो पुतळा कोसळला आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मोदी हात लावतात त्याची माती होत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. तो आमच्या मनावरील आघात कधीही भरला जाऊ शकत नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे घाई घाईत अनावरण केले होते. इतक्या घाईत या पुतळ्याचे अनावरण करू नका, असे आधीच सांगण्यात आले होते. मात्र तरीही त्यांनी घाईने पुतळ्याचे अनावरण केले. इतकंच नाही तर त्या पुतळ्याच्या बांधकामाविषयी आणि शिल्पकलेविषयी अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला होता. त्यात इंद्रजीत सावंत यांचा देखील समावेश होता. स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी देखील त्याच्यावर काही आक्षेप घेतले होते. तरीही तो पुतळा घाईघाईने बसवण्यात आला. आता तो पुतळा कोसळला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा असा कधीही अपमान झाला नसल्याचे ते म्हणाले. औरंगजेब आणि मोगल राजांनी देखील आमच्यावर अनेक हल्ले केले. मात्र, छत्रपतींचा असा अपमान मुघल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनीही केला नव्हता. आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानाने सुटून आले. मात्र, आपल्याच राज्यात कोसळून पडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र, मोदी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार असल्याचा आरोपही खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम केले आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मर्जीतला ठेकेदारांना हे काम नेहमीप्रमाणे देण्यात आले. त्यामुळे याच्यात किती कमिशन मिळाले, याचा हिशोब द्यावा लागणार आहे. ठेकेदार, शिल्पकार हे सर्व ठाण्यातले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या मागचे कारण काहीही सांगत असतील. मात्र, आज महाराष्ट्र दुःखी आहे. महाराष्ट्राच्या छातीमध्ये आरपार वेदना होत आहेत. त्याची भरपाई कधीही करू शकत नसल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. गिरगाव चौपाटीवरील टिळकांच्या पुतळ्याचे उदाहरण महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे होताना मी पाहिले, तशी वेळ महाराष्ट्रावर कधी येईल, असे कधीही वाटले नव्हते. मात्र सरकार अजूनही हसत आहे. सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना दिसत नाही. सरकार समुद्रावर जोराचा वारा असल्याचे कारण देत आहे. मात्र समुद्रावर आणि किल्ल्यांवर वारा असणारच. 1933 साली गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला, तो अजूनही तसाच आहे. तिथेही तोच वारा, त्याच वेगाने वाहत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 1956 साली पंडित नेहरूंनी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. त्या किल्ल्यावर देखील मोठ्या प्रमाणात हवा आहे. मात्र, तो पुतळा देखील अजून कायम असल्याचे राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा – राऊत महायुती सरकारने चांगल्या मनाने पुतळा उभारला नाही, त्यामुळे मी सर्वात आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच रवींद्र चव्हाण यांना बरखास्त करायला हवे, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील यांनी सोडले नाही. या कामात देखील त्यांनी लाखो, कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाही ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करत आहेत. याच्यावर महाराष्ट्र शांत बसणार नाही. यावर महाविकास आघाडी गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती राऊत यांनी दिली. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… बदलापूरची घटना ताजी असताना रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर जंगलात बलात्कार:ऑटोचालकाचे कुकृत्य; नागरिक संतप्त बदलापूर येथील घटना ताजी असताना रत्नागिरीमध्ये आणखी एका लाडक्या बहिणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्नागिरी शहरात राहणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थिंनीवर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याचे समोर आल्यानंतर रत्नागिरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच पोलिस निरीक्षकांना देखील घेराव घालण्यात आला. आरोपीला पकडा आणि त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी संतप्त नागरिकांनी यावेळी केली. लाखो रुपये खर्च करून शहरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मात्र ते बंद आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासन तोंडघशी पडले असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा…