मुंबई : छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर शंभूराज देसाई यांनीही छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला होता. या पार्श्वूमीवर मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामुळे या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेतले जाणार? याविषयी चर्चा रंगल्या होत्या. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वादावर चर्चा झाली नाही. अधिकाऱ्यांना बाहेर जायला सांगून पुढच्या काही वेळात मुख्यमंत्र्यांनी वाद घालणाऱ्या मंत्र्यांना संयमाचा सल्ला दिला.

मराठा-ओबीसी आरक्षणावरून सरकारमधील नेते-मंत्री वाद घालताना दिसून येत आहे. त्याचवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगून सरकारमधील मंत्र्यांनी एकमेकांविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली. जर अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधात वक्तव्य केली जात असतील तर सरकारमधील दुही असल्याचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे मंत्र्यांनी भूमिका मांडताना संयमाने भूमिका मांडावी, असं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर फडणवीसांनीही मान डोलावत हा प्रश्न संयमाने घेण्याचा सल्ला संबंधित मंत्र्यांना दिला.

मनोज जरांगेंचा एकेरी उल्लेख, ओबीसीतील जातींना बाहेर ढकलून स्पेस बळकावण्याचा डाव; छगन भुजबळांचा आरोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. तसेच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याला विरोध दर्शवला. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह शिंदे गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात आक्रमक झाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना संयमाचा सल्ला देत मध्यस्थी केली, अशी माहिती एका मंत्र्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

छगन भुजबळांनी वात पेटवली, आता मुंबईतील बंगल्यावर ओबीसी नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक, पुढे काय घडणार?
मराठा ओबीसी आरक्षण संघर्षानंतर शिंदे- फडणवीस- पवार सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी ट्विट करून बेकायदेशीरपणे अठरापगड जातीचे आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप करून ओबीसी समाज हे कदापि सहन करणार नसल्याचा इशाराच दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *