मानसिक आजारांना ‘स्टेटस डिसीज’ प्रमाणे हाताळले जायला हवे:समाजसेवक डॉ. राजेंद्र व डॉ सुचेता धामणे दाम्पत्याचे मत
मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार आज ‘स्टेटस डिसिज’ म्हणून समाज समजून घेतो, स्वीकारतो आहे. मात्र, मानसिक आजारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा आहे. जर लग्नानंतर पती मानसिक रुग्ण झाला तर बायको त्याची आयुष्यभर सेवा करते. पण जर हेच महिलेच्या बाबतीत झाले तर पती आणि कुटुंबीय तिचा सांभाळ करणे तर सोडाच उलट तिला बहिष्कृताचे जगणे जगण्यास सोडून देतात. हे चित्र बदलणे आज गरजेचे असून मानसिक आजारांबद्दल जागृत व्हायला हवी असल्याचे मत माऊली सेवा प्रतिष्ठान या निराधार, मानसिक, शारीरिकदृष्ट्या आजारी व पिडीत महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक आणि समाजसेवक डॉ. राजेंद्र व डॉ सुचेता धामणे या दाम्पत्याने व्यक्त केले. पुण्यातील पी. एम. शहा फाऊंडेशन व वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सामान्य ते असामान्य’ या प्रकट मुलाखत व संवाद कार्यक्रमात या दोघांनी आपला प्रवास उपस्थितांसमोर उलगडला त्यावेळी ते बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील वर्धमान प्रतिष्ठानच्या सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न झाला. पी. एम. शहा फाऊंडेशनचे संचालक ॲड चेतन गांधी आणि दिशा बर्वे यांनी डॉ धामणे दाम्पत्याशी संवाद साधला. वर्धमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास राठोड यावेळी उपस्थित होते. डॉ राजेंद्र धामणे म्हणाले,आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ हून जास्त वर्ष झाली असली तरी आज आपल्या समोर गंभीर प्रश्नांची मालिका आहे. मानसिक रुग्ण असलेल्या अनेक माता भगिनींना आपले आयुष्य रस्त्यावर काढावे लागते, हा यातीलच एक महत्त्वाचा प्रश्न. आपण उठता बसता छत्रपती शिवाजी महाराज, फुले- शाहू- आंबेडकर यांचे नाव घेत असतो, मात्र त्यांची शिकवण, त्यांचे विचार अंगीकारायला मात्र विसरतो आहोत.मानसिक रुग्ण महिलांसाठी काम करायचे हे कधी ठरविले या प्रश्नाचे उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, राहत्या गावापासून अहमदनगर या २२ किलोमीटरच्या प्रवासात आम्हाला अनेक मानसिक रुग्ण असलेल्या महिल्या दिसायच्या. तेव्हा मला आणि बायकोला या महिला येतात कुठून हा प्रश्न कायम पडायचा. या विषयाच्या खोलात शिरल्यावर अनेक दुर्दैवी वास्तव समोर आली आणि याच क्षेत्रात काम करायचे हा निश्चय आम्ही दोघांनी केला.