सरपंच हत्या प्रकरणी हायकोर्टातील याचिका प्रलंबित ठेवा:धनंजय देशमुखांची न्यायालयाला विनंती, तपासावर समाधानी असल्याचे व्यक्त केले मत
संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीआधी सरपंच संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठा निर्णय घेतला आहे. धनंजय देशमुख यांनी भावाच्या हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली एक याचिका प्रलंबित ठेवण्याची विनंती कोर्टाला केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सध्या सुरू असलेल्या तपासावर बऱ्यापैकी समाधानी असल्याचे मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त करत तपास यंत्रणेला आणखी वेळ द्यावा, असे म्हणत त्यांनी ही विनंती केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे राज्यात चांगलेच वादंग उठले आहे. या हत्येमागचा मास्टरमाइंड धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड असल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयात क्रिमिनल रेट याचिका दाखल केली होती. वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा आणि मोक्का लावावा, तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. संतोष देशमुख हत्याप्रकरणात तपासाला दिशा देण्यासाठी धनंजय देशमुखांची याचिका दाखल केली होती. मात्र, धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यापूर्वीच त्यांनी ही याचिका प्रलंबित ठेवावी, अशी विनंती न्यायालायाला केली. तपास यंत्रणेला आणखी वेळ द्यावा, असे म्हणत पुढील सुनावणी न घेण्याची त्यांनी विनंती केली आहे. धनंजय देशमुख हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. तत्पूर्वी त्यांना या भेटीविषयी विचारले असता, आज मुख्यमंत्र्यांशी काही गोष्टी बोलायच्या आहे, त्यानंतर मी माध्यमांशी बोलणार असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. धनंजय देशमुखांनी याचिकेत केल्या होत्या खालील मागण्या