बांगर यांना आणण्यासाठी ‎मुख्यमंत्र्यांनी पाठवले विमान‎:हैदराबादहून मुंबईला रवाना, राजकीय वर्तुळात मंत्रिपदाची चर्चा‎

बांगर यांना आणण्यासाठी ‎मुख्यमंत्र्यांनी पाठवले विमान‎:हैदराबादहून मुंबईला रवाना, राजकीय वर्तुळात मंत्रिपदाची चर्चा‎

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना‎ तातडीने मुंबईला येण्याचे आदेश मिळाले. ‎‎त्यांना घेऊन जाण्यासाठी ‎‎‎मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‎‎यांनी हैदराबाद येथे खासगी ‎‎‎विमान पाठवले आहे.‎‎रविवारी सायंकाळी ते‎‎मुंबईकडे रवाना झाले‎‎ आहेत.‎ ‎मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‎‎यांचे विश्‍वासू आमदार‎म्हणून आमदार संतोष बांगर यांची ओळख‎आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा‎निवडणुकीत आमदार बांगर यांनी एकहाती‎विजय मिळवला. हिंगोली येथे शनिवारी‎मारहाणीमध्ये आमदार बांगर यांचे पुतणे गौरव‎बांगर यांना पोटात गोळी लागली. गौरव‎यांच्यावर हैदराबाद येथे रुग्णालयात उपचार‎सुरु अाहेत. त्यांच्या देखभालीसाठी आमदार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎बांगर यांच्यासह त्यांचे कुटुंबिय हैदराबाद येथे‎थांबले आहेत. दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री‎एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्यांना मुंबईत‎पोहोचण्याचे आदेश दिले. त्यांना हैदराबाद‎येथून मुंबईला येण्यासाठी खासगी विमानही‎पाठविले. त्यामुळे दुपारी खासगी विमान‎हैदराबाद विमानतळावर पोहोचले. त्यानंतर‎सायंकाळीच आमदार बांगर मुंबईला रवाना‎झाले. त्यांना तातडीने मुंबईला येण्याचा आदेश‎मिळाल्यामुळे आमदार बांगर यांची‎मंत्रीमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चा सुरु‎झाली आहे. मतमोजणीपुर्वीच आमदार बांगर‎यांचे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले होते.‎ मंत्रिमंडळ स्थापनेची लगबग‎ महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता‎आमदारांना तातडीने मुंबईला बोलावले जात‎आहे. त्याच पार्श्वभूमीवर बांगर यांनाही मुंबईला‎बोलावल्याने पुढील निर्णयाकडे हिंगोली‎जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.‎

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment