ही पोस्ट करत हेमांगीने तिचा मेकअप केलेला आणि बिना मेकअपचा फोटो शेअर केला आहे. पोस्ट करत हेमांगीने लिहिलं, ‘लूक्सच्या बाबतीत आपला आदर्श ठरलाय रजनीकांत. चित्रपटाव्यतिरिक्त ही व्यक्ती बिना मेकअप आणि विग बिनदिक्कत कुठेही फिरते. ही मुभा स्त्री कलाकारांला नाही आणि समजा माझ्यासारखीने ती घ्यायची ठरवली मग ते स्क्रिन असो वा वैयक्तिक आयुष्य तर तिला सोशल मीडियावरवर ‘ही तर कचरेवाली, धुणी भांडी करणारीच वाटते. कामवालीचेच रोल करते, ही कुठल्या अॅगलने अभिनेत्री वाटते, आता म्हातारी दिसायला लागली वगैरे वगैरे सुरू होतं. मी सोशल मीडियावर माझी मतं, पोस्ट लिहायच्या आधीपासून सुरू झालेलं आहे.’
पुढे हेमांगीने लिहिलं, ‘सुरवासुरवातीला या कमेंटने वाईट वाटायचं, मग ह्या स्त्री- पुरुष कलाकारांच्या बाबतीतल्या फरकाबद्दल राग येऊ लागला पण आता दिसण्यातल्या खरेपणाला ज्यादिवसापासून आपलं केलं ना त्या दिवसापासून कशाचंच काही वाटत नाही. आपण मेकअप केला तर सौंदर्याच्या मोजपट्टीत आपण छान, आकर्षक वगैरे दिसतो आणि नाही केला तरी ‘जसे आहोत तसे बेस्टच आहोत’ हे फिलिंग असतं. हा फ्रिडम मी माझ्यापुरता तरी मिळवलाय. खरंच. मेकअप करणं हा माझ्या कामाचा भाग आहे, तो केल्याने मी सुंदर, छान, आकर्षक दिसण्यापेक्षाही मी निभावत असलेली भूमिका दिसणं जास्त गरजेचं असतं. मेकअप केल्याने कायापालट होतो. अभिनयात तेच महत्त्वाचं असतं. नाही का?
पुढे ती लिहिते, ‘पण काही लोकांना हे कळतंच नाही. द्वेषापोटी काही ही बोलत सुटतात. असो. आज काय त्यांचा वाढदिवस वगैरे नाहीए. काल ‘जेलर’ पाहीला आणि जाणवत राहीलं. हा माणूस प्रत्यक्षात किती वेगळा पण तोच पडद्यावर आल्यावर किती वेगळा.’