लखनऊ: एका शाळकरी विद्यार्थिनीचा रहस्यमय मृत्यू झाला आहे. विद्यार्थिनी इयत्ता दहावीत शिकत होती. सुट्टी असूनही तिला फोन करुन शाळेत बोलावून घेण्यात आलं होतं. शाळेत पोहोचल्यानंतर काही वेळातच मुलगी झोपाळ्यावरुन पडून जखमी झाल्याची माहिती समोर आली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कुटुंबियांनी तातडीनं रुग्णालयात धाव घेतली. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. लेकीच्या निधनाबद्दल समजताच कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.मुलीच्या मृत्यूची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यासाठी शाळेतील सीसीटीव्ही तपासले. त्यात विद्यार्थिनी छतावरुन खाली पडताना दिसली. ‘मुलगी झोपाळ्यावरुन पडल्याचं आम्हाला शाळेतून सांगण्यात आलं. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती छतावरुन खाली कोसळताना दिसत आहे. आमच्या लेकीसोबत काहीतरी चुकीचं घडलंय. तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आम्हाला वाटतो,’ असं म्हणत मुलीच्या कुटुंबियांनी घटनाक्रमाबद्दल शंका व्यक्त केली.
मुंबईकर मुलाचं भयंकर कृत्य; जंगलात महिलेला निर्घृणपणे संपवलं, चेहऱ्यासोबत नको ते केलं
२६ मेच्या सकाळी पावणे नऊच्या सुमारास अनन्या तिच्या घरातून निघाली. काही वेळातच ती सनबीम शाळेत पोहोचली. अनन्याच्या शाळेतून तिला फोन करुन बोलावण्यात आलं होतं. सकाळी १० च्या दरम्यान अनन्याच्या शाळेतून तिच्या पालकांना फोन करण्यात आला. अनन्या शाळेतील झोपाळ्यावरुन पडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती शाळेकडून देण्यात आली. कुटुंबियांनी रुग्णालय गाठलं. मात्र तोपर्यंत अनन्याचा मृत्यू झाला होता.
निळे पडलेले चेहरे, तोंडाला फेस; एकाच बेडवर वडील, लेक, नातवाचे निष्प्राण देह; काय घडलं?
अनन्याच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. डोळ्यावरही इजा झाली होती. तिचा हात मोडलेला होता. पायाला गंभीर दुखापत झाली होती, असं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं. झोपाळ्यावरुन पडल्यानं मुलीला इतक्या जखमा होऊ शकत नाहीत. तिला मारहाण केली असेल, त्रास दिला गेला असेल, तरच तिच्या शरीरावर इतक्या जखमा असू शकतात, असं अनन्याचे कुटुंबीय म्हणाले. घडलेल्या संपूर्ण प्रकरणाबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला.

अनैतिक संबंध असल्याचा संशय, रागात त्यानं प्रेयसी आणि मुलांना संपवलं

अनन्याची हत्या झाली असावा असा संशय कुटुंबियांनी बोलून दाखवला. दीड फूट उंच असलेल्या झोपाळ्यावरुन पडून मृत्यू होऊ शकत नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनन्या छतावरुन पडताना दिसत आहे, असं तिच्या कुटुंबियांनी म्हटलं. या प्रकरणात पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *