पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला:गणेवशाचे धक्कादायक चित्र; विरोधी पक्षाचा राज्य सरकारवर निशाणा
राज्य सरकारच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाच्या दर्जावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहेत. सरकारी शाळे मधील अनेक गरीब विद्यार्थी शासनाकडून मिळणाऱ्या गणवेशावर अवलंबून असतात. मात्र, या गणवेशाचे दशा पाहून कोणाच्याही मनात संतापाची भावना निर्माण होऊ शकते, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केली आहे. या संबंधात दानवे यांनी एका शाळकरी विद्यार्थ्यांचा गणवेशातील फोटो पोस्ट केला आहे. तसेच यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या चिमुकल्याने घातलेला गणवेश पाहता महाराष्ट्रातील त्रांगड्या सरकारची दशा दिसून येत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केला आहे. पहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पँटला, ही काही विद्यार्थ्यांची चेष्ठा सुरू आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थी हा प्रयोगशाळेत जात प्रयोग करत असतो मात्र, येथे विद्यार्थ्यांचीच प्रयोगशाळा करून ठेवली, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. शालेय विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट 2024 पर्यंत गणवेश वाटले जाणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. मात्र त्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही. त्यामुळे विरोधकांच्या वतीने राज्य सरकारवर आधीच टीका केली जात होती. आता जे गणवेश वाटण्यात आले आहेत. त्यांच्या दर्जावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आता या संदर्भात राज्य सरकार काय स्पष्टीकरण देणार? हे पहावे लागेल. आमदार रोहित पवार यांनी देखील या आधी विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या संदर्भात त्यांनी विधानसभेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या वतीने रोहित पवार यांचा प्रश्न उडवण्यात आला होता. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेश मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. मात्र, आता या गणवेशाच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला या संदर्भात अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, ‘या चिमुकल्याने घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे, महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे! पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्ट ला.. काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा शिक्षण मंत्री दिपक केसरकरजी. विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा करून ठेवली आहे. 15 ऑगस्ट 2024 पर्यंत 45 लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ 24 लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत. ते ही हे असले बोगस! कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची! हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत. त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत.’ राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… भाजपच्या थैलीशाही व मुजोर राजकारणाचा पराभव:परिवर्तनाची चाहूल असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे गटाचा BJP वर जोरदार हल्ला तरुणांचा आवाज म्हणून विद्यापीठांच्या ‘सिनेट’कडे पाहिले जाते. फी, परीक्षा, अभ्यासक्रम यावर तेथे चर्चा घडतात व निर्णय होतात. पदवीधरांचा आवाज हा लाखो तरुणांचा आवाज आहे. तरुणांच्या हाती देशाचे भवितव्य आहे. त्या पदवीधरांच्या सिनेट निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत हे धोरण पराभवाच्या भयातून आले होते. मात्र मुंबई विद्यापीठात पदवीधरांनी भाजपच्या थैलीशाही व मुजोर राजकारणाचा पराभव केला. ही परिवर्तनाची चाहूल असल्याचे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे. त्यांनी दैनिक सामानाच्या माध्यमातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पूर्ण बातमी वाचा…