बिजिंग: चोरी, दरोड्याच्या घटनांमध्ये चोर-दरोडेखोर घरात घुसून जे काही हाती लागेल ते पळवून लावतात. पकडले जाण्याचा धोका असल्याने ते कधीही चोरीच्या ठिकाणी जास्त वेळ घालवत नाहीत. तर काही चोर हे वेगळ्याच प्रकारचे असतात, जे दुसऱ्याचे घर स्वतःचे समजतात, आरामात चोरी करतात आणि कधी कधी तर खाऊन पिऊन तिथेच झोपतातही.

चीनमध्ये एका चोरासोबत असंच काहीसं घडलं आहे. तो चोरी करण्यासाठी आला होता. घरातील लोक झोपल्यानंतर चोर अनेकदा गुप्तपणे घरात घुसतात आणि घरातील मौल्यवान वस्तू चोरतात. हा चोर एवढा आळशी निघाला की तो चोरी करता करताच झोपी गेला. हा किस्सा खूप मनोरंजक असून सोशल मीडियावर नेटकरी यावर चर्चा करताना दिसत आहेत.

दहा दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचं काय झालं? ६ इंच पोकळीत कॅमेरा टाकला, पहिला VIDEO जगासमोर
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनमधून एक चोर चोरीसाठी युनान प्रांतात पोहोचला होता. ही घटना ८ नोव्हेंबरची असल्याची माहिती आहे. चोर घरात शिरल्यावर त्याला घरातील लोकांच्या बोलण्याचा आवाज आला. पण तिथून निघून जाण्याऐवजी त्याने घरातील लोक झोपी जाण्यापर्यंतची वाट बघण्याचा निर्णय घेतला. पण, घडलं भलतंच. घरातील लोक झोपण्यापूर्वी त्याने सिगारेट ओढली आणि तोच झोपी गेला.

काही वेळात घरात कुणाच्यातरी घोरण्याचा आवाज येऊ लागला. घरच्यांना कळालं नाही की हा आवाज नेमका कुठून येतो आहे. सुरुवातीला त्यांना वाटलं की तो शेजाऱ्यांचा आवाज आहे. त्यामुळे ते निश्चिंत होऊन झोपी गेले. पण, ४० मिनिटांनी जेव्हा घरातील महिला मुलाची दुधाची बाटली साफ करण्यासाठी आली, तेव्हा तिला घोरण्याचा आवाज अधिकच तीव्र झालेला जाणवू लागला.

महिलेने तिच्या दुसऱ्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा तिला तिथे एक अनोळखी व्यक्ती झोपलेली दिसली. तिने तात्काळ इतरांना याबाबत सांगितले आणि कुटुंबीयांनी पोलिसांना बोलावलं. दुसरीकडे, हा चोर इतका गाढ झोपेत होता की पोलिस येईपर्यंत तो उठलाही नाही आणि तो पकडला गेला. नंतर कळालं की हा चोर याआधीही तुरुंगात गेला होता.

मित्राने दार ठोठावलं, तो प्रतिसाद देईना, दार तोडताच समोर भयंकर दृश्य, नागपुरात डेंटिस्टने…
Read Latest Maharashtra News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *