म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. एकीकडे टँकरने होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे प्रमाण वाढत असतानाच राज्यातील सुमारे दोन हजार ९९४ धरणांमध्ये सोमवारपर्यंत केवळ ६९.१९ टक्के पाणीसाठा उरल्याची माहिती समोर आली आहे. धरणांमधील पाणीसाठ्याचे हे प्रमाण गेल्या वर्षी याच काळात ८९.७० टक्के इतके होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्क्यांनी पाणीसाठा कमी असल्याने राज्याला दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याचे दिसते आहे. मुख्य म्हणजे, औरंगाबाद परिसरात ही टंचाई भीषण असून औरंगाबाद येथे सोमवारपर्यंत केवळ ३६.२६ टक्के इतका पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे.

तीन वर्गवारींनुसार आकडेवारी

पाणीपुरवठा विभागाने तीन वर्गवारींनुसार धरणांतील पाणीसाठा आणि इतर माहिती जाहीर केली आहे. त्यात मुख्य, मध्यम आणि सूक्ष्म धरणांचा समावेश आहे. राज्यातील १३८ मुख्य धरणांमध्ये सध्या ७४.५१ टक्के (गेल्या वर्षी हे प्रमाण ९४.२९ टक्के इतके होते) पाणीसाठा शिल्लक आहे. या १३८ धरणांची क्षमता २८०९८.५६ एमसीएम इतकी असून, सध्या २१६५९.२३ एमसीएम इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

Mumbai Pollution: धुरक्यात हरवली मुंबई! वाढलेल्या प्रदूषणावर अचानक ‘मार्गदर्शक तत्त्वांचा’ मारा
औरंगाबाद येथील परिस्थिती चिंताजनक

औरंगाबाद येथे सध्या एकूण ३६.२६ टक्के इतकाच पाणीसाठा उरला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वांत कमी आहे. धरणांच्या विभागवार नोंदीनुसार, औरंगाबाद येथील ४४ मुख्य धरणांमध्ये केवळ ४१.८५, तर मध्यम आकाराच्या ८१ धरणांमध्ये केवळ २९.५८ टक्के आणि सूक्ष्म आकाराच्या ७९५ धरणांमध्ये अवघे २५.६८ टक्के पाणी असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले होते पडसाद

राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत राज्यातील पाणीटंचाईबाबत चर्चा झाल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यावेळी विशेषत: मराठवाड्यातील पाणीटंचाईबाबत चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रश्नी सविस्तर चर्चा केल्याचे कळते. त्याचवेळी जायकवाडी प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आग्रही भूमिका घेतल्याची माहितीही पुढे आली आहे.

धरणांमधील एकूण पाणीसाठा (टक्केवारी)

जिल्हा एकूण धरणे सध्याचा साठा गेल्या वर्षीचा साठा

नागपूर ३८३ ७२.८८ ८३.१७

अमरावती २६१ ७८.४५ ९६.१२

औरंगाबाद ९२० ३६.२६ ८९.९९

नाशिक ५३७ ७५.३९ ८९.६५

पुणे ७२० ७४.९१ ९०.७७

कोकण १७३ ८६.२७ ८६.३५

एकूण २,९९४ ६९.१९ ८९.७०

Thane Traffic: मनोज जरांगेंची आज ठाण्यात सभा; पोलिसांकडून वाहतूक मार्गात मोठे बदल, कोणते रस्ते राहणार बंद?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *