रोम: आपलं जग रहस्यांनी भरलेलं आहे. पृथ्वीवरील अनेक रहस्यं आपल्या समोर आलेली नाहीत. तर काही रहस्यांचा उलगडा झालेला नाही. समुद्राच्या पोटात शिरलेल्या पाणबुड्यांच्या हाती खजिना लागला आहे. खजिना पाहून पुरातत्त्वशास्त्रज्ञ चकित झाले. हा खजिन्याची किंमत जास्त आहे. यामुळे हजारो वर्षांपूर्वीची रहस्य उलगडू शकतात. सरकार आणि शास्त्रज्ञ याबद्दल अधिक माहिती गोळा करत आहेत.इटलीच्या सार्डिनिया किनाऱ्यापासून काही अंतरावर पाणबुडे समुद्राच्या तळाशी गेले होते. तेव्हा त्यांना वाळूमध्ये धातूच्या काही वस्तू दिसल्या. भांडी असावीत असा अंदाज त्यांनी बांधला. त्यांनी त्या ठिकाणी खोदकाम सुरू केलं. वाळूला बाजूला करताच प्राचीन नाणी त्यांच्या दृष्टीस पडली. वाळूमध्ये जवळपास ५० हजार रोमन नाणी सापडली. ती हजार वर्षे जुनी आहेत.समु्द्राच्या पोटात सापडलेला खजिना पाहून पुरातत्त्वशास्त्रज्ञांना आश्चर्याचा धक्काच बसला. प्राचीन काळात जुनं जहाज बुडालं असावं आणि ही नाणी त्यातली असावीत असा त्यांचा अंदाज आहे. समुद्रात नाणी सापडल्याच्या वृत्ताला इटालियन सरकारच्या संस्कृती मंत्रालयानं दुजोरा दिला आहे. समुद्राच्या तळाशी आढळलेली सगळी नाणी कांस्याची आहेत. ती रोमन साम्राज्याशी संबंधित असल्याचा कयास आहे.समुद्रात सापडलेल्या नाण्यांना फोलिस म्हटलं जातं. रोमन सम्राट डायोक्लेटियननं इसवी सन २९४ मध्ये ही नाणी चलनात आणली. इटलीच्या संस्कृती मंत्रालयानुसार, समद्रात सापडलेली नाणी ३२४ ते ३४० या कालावधीतील आहेत. नाणी पूर्णपणे सुरक्षित आहेत. केवळ ४ नाण्यांचं नुकसान झालं. पण तरीही ती बऱ्यापैकी स्पष्ट दिसतात.नाणी सापडली त्याच भागात आसपास एखाद्या जहाजाचे अवशेष सापडण्याची शक्यता संस्कृती मंत्रालयानं व्यक्त केली. नाण्यांच्या रुपात सापडलेल्या खनिज्यामुळे त्या काळातील समृद्धी अधोरेखित होत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं. त्या काळात माणसाकडून या मार्गाचा वापर व्हायचा ही गोष्ट यामुळे स्पष्ट झाली. नाणी सापडलेल्या भागात एखाद्या जहाजाचे अवशेष सापडण्याची दाट शक्यता आहे. ते आढळल्यास प्राचीन काळातील अनेक रहस्यं उलगडू शकतात, अशी आशा पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *