मोदी सरकार काही दिवसांचे सोबती:पाच ते सहा महिन्यांत नितीश कुमार अन् चंद्राबाबू साथ सोडतील, जयंत पाटील यांचा विश्वास

मोदी सरकार काही दिवसांचे सोबती:पाच ते सहा महिन्यांत नितीश कुमार अन् चंद्राबाबू साथ सोडतील, जयंत पाटील यांचा विश्वास

केंद्रातील मोदी सरकार काही दिवसांचे सोबती आहे. पुढील पाच ते सहा महिन्यांत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू त्यांची साथ सोडतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेला सत्ताधाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. विधानसभा निवडणुकीतही आमची सत्ता येणार असल्यामुळे महायुती सरकार कोणत्याही योजना राबवून तिजोरी रिकामी करत आहे, असा आरोप पाटील यांनी केला. ते निघोज शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते. निघोज येथे राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पोहोचल्यानंतर सभेत जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरू असून निवडणुकीच्या तोंडावर या गैरवापराला कोणताही पारावार राहिला नाही, महायुती सरकारने जाहिरातींवर भरमसाठ खर्च केल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला. सत्ताधाऱ्यांकडून जाहिरातींवर भरमसाठ खर्च राज्य सरकारने शिर्डी येथे घेतलेल्या एका कार्यक्रमासाठी पाच ते सात कोटी रुपये खर्च केला. या कार्यक्रमाला महिलांना नेण्यासाठी एसटी बसेसचा वापर केल्याने शाळा, कॉलेजात जाणारे विद्यार्थी रस्त्यावर ताटकळत उभे असल्याचे चित्र जिल्हाभरात पाहावयास मिळाले. ‘सरकार आपल्या दारी’कार्यक्रमासाठी लोकांचे दाखले रखडवण्यात आले, असेही पाटील म्हणाले. यावेळी शिवस्वराज्य यात्रेमध्ये खासदार अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके, महेबूब शेख, माजी आमदार राहुल जगताप, राणी लंके, अर्जुन भालेकर हे देखील उपस्थित होते. उमेदवार निवडची जबाबादारी खासदार निलेश लंके यांच्याकडे सोपवली आहे. त्यांनी नावाची घोषणा केल्यास, मी लगेच एबी फॉर्मवर सही करतो, अशी टिपण्णी जयंत पाटील यांनी यावेळी केली. तर 2019 मध्ये निघोज येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात झाली होती. त्यावेळी राज्यात परिवर्तन झाले होते. यंदाच्या निवडणुकीतही राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. याचे उदाहरण नुकतेच लोकसभा मतदारसंघात परिवर्तन झाले. त्यामुळे आता पारनेर, अहमदनगर मतदारसंघातही महाविकास आघाडीचा विजय होणार आहे, असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला. हेही वाचा… रोहित पवार मुख्यमंत्री होणार?:रोहित पुढची 5 वर्षे महाराष्ट्राची सेवा करेल, शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण रोहितची पहिली पाच वर्षे ही तुमची सेवा करण्यासाठी होती. आता पुढील पाच वर्ष रोहित महाराष्ट्राची सेवा करेन, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर बातमी वाचा…

​केंद्रातील मोदी सरकार काही दिवसांचे सोबती आहे. पुढील पाच ते सहा महिन्यांत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू त्यांची साथ सोडतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेला सत्ताधाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. विधानसभा निवडणुकीतही आमची सत्ता येणार असल्यामुळे महायुती सरकार कोणत्याही योजना राबवून तिजोरी रिकामी करत आहे, असा आरोप पाटील यांनी केला. ते निघोज शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते. निघोज येथे राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पोहोचल्यानंतर सभेत जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरू असून निवडणुकीच्या तोंडावर या गैरवापराला कोणताही पारावार राहिला नाही, महायुती सरकारने जाहिरातींवर भरमसाठ खर्च केल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला. सत्ताधाऱ्यांकडून जाहिरातींवर भरमसाठ खर्च राज्य सरकारने शिर्डी येथे घेतलेल्या एका कार्यक्रमासाठी पाच ते सात कोटी रुपये खर्च केला. या कार्यक्रमाला महिलांना नेण्यासाठी एसटी बसेसचा वापर केल्याने शाळा, कॉलेजात जाणारे विद्यार्थी रस्त्यावर ताटकळत उभे असल्याचे चित्र जिल्हाभरात पाहावयास मिळाले. ‘सरकार आपल्या दारी’कार्यक्रमासाठी लोकांचे दाखले रखडवण्यात आले, असेही पाटील म्हणाले. यावेळी शिवस्वराज्य यात्रेमध्ये खासदार अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके, महेबूब शेख, माजी आमदार राहुल जगताप, राणी लंके, अर्जुन भालेकर हे देखील उपस्थित होते. उमेदवार निवडची जबाबादारी खासदार निलेश लंके यांच्याकडे सोपवली आहे. त्यांनी नावाची घोषणा केल्यास, मी लगेच एबी फॉर्मवर सही करतो, अशी टिपण्णी जयंत पाटील यांनी यावेळी केली. तर 2019 मध्ये निघोज येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात झाली होती. त्यावेळी राज्यात परिवर्तन झाले होते. यंदाच्या निवडणुकीतही राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. याचे उदाहरण नुकतेच लोकसभा मतदारसंघात परिवर्तन झाले. त्यामुळे आता पारनेर, अहमदनगर मतदारसंघातही महाविकास आघाडीचा विजय होणार आहे, असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला. हेही वाचा… रोहित पवार मुख्यमंत्री होणार?:रोहित पुढची 5 वर्षे महाराष्ट्राची सेवा करेल, शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण रोहितची पहिली पाच वर्षे ही तुमची सेवा करण्यासाठी होती. आता पुढील पाच वर्ष रोहित महाराष्ट्राची सेवा करेन, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment