विद्यापीठाची शोध मोहीम सुरू:‘फुल कॅरी ऑन’चा निर्णय घेण्यास कारणीभूत प्राध्यापकांवर होणार कारवाई; चुकीच्या मुल्यांकनाचा ठपका
चुकीचे मुल्यांकन झाल्याने विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये बहुतेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत. त्यामुळे विद्यापीठाने अशा सर्व विद्यार्थ्यांना यावर्षी सरसकट वरच्या वर्गात प्रवेश (फुल कॅरी ऑन) देण्याचा निर्णय घेतला आहे. आज, गुरुवार, ५ सप्टेंबरला यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला. परंतु हा आदेश जारी करण्यासाठी जे प्राध्यापक कारणीभूत ठरले, विद्यापीठ प्रशासन त्यांच्यावरही कारवाई करणार आहे. त्यासाठीची शोध मोहीम परीक्षा विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या विद्वत परिषदेची (अकॅडेमिक कौन्सिल) तहकूब सभा दोन दिवसांआधी घेण्यात आली. या सभेवर अनेक विद्यार्थी संघटनांनी मोर्चा आणला होता. त्या आंदोलनाची गंभीरता लक्षात घेता परिषदेने ‘फुल कॅरी ऑन’ चा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अभियांत्रिकी, विधी यासह कला, वाणिज्य, विज्ञान शाखेशी संबंधित सर्वच अभ्यासक्रमांतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना यावर्षी वरच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. नांदगाव खंडेश्वर येथील कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्यारेलाल सूर्यवंशी यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्याला सभागृहाने सर्वसंमतीने मान्यता प्रदान केली. दरम्यान हा प्रस्ताव पारित करित असतानाच ही बाब योग्य नसून विद्यार्थ्यांना वारंवार अशी सवलत देण्याऐवजी मुल्यांकनच योग्यरित्या केले जावे, असा मुद्दा समोर आणला गेला. यावर बरेच मंथन झाले. शेवटी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून यावर्षीपुरता कॅरी ऑनचा निर्णय घ्यावा. मात्र त्याचवेळी चुकीचे मुल्यांकन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारुन अशी वेळच येणार नाही, याचीही दखल घेतली जावी, अशी मागणी सभागृहाने नोंदवली. या निर्णयामुळे चुकीचे मुल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांचे धाबे दणालले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने त्यादृष्टीने पावले उचलली असून संबंधितांची शोध मोहिम सुरु केली आहे. पुनर्म्युलांकनासाठी आलेल्या अर्जांच्या आधारे ही शोध मोहिम पुढे जाणार असून त्या-त्या विषयात कुणी चुकीचे मुल्यांकन केले, हे लगेच पुढे येईल, अशी माहिती आहे. चौकट—- …म्हणून कॅरी ऑनचा निर्णय उत्तीर्ण होण्याची क्षमता असतानाही चुकीचे मुल्यांकन झाल्यामुळे विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये यावर्षी बरेच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यापैकी काहींनी पुनर्म्युलांकनाची मागणी केली. त्यात ते उत्तीर्ण झाले. हा मुद्दा लक्षात घेत विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थ्यांच्या अनुत्तीर्णतेचे खापर विद्यापीठ प्रशासनावर फोडले होते. हाच धागा पकडून विद्वत परिषदेला कॅरी ऑनचा निर्णय घ्यावा लागला.