नागपूर: गोंदिया येथील एका १७ वर्षीय अशक्त मुलीचे प्राण वाचवण्यासाठी भोपाळ येथील हितेश अरोरा (Hitesh Arora) यांनी रात्रभर प्रवास करून नागपूर गाठले आणि रक्तदान केले. चांदणी कुरसुंगे या मुलीला गोंदिया जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले होते आणि ती जवळपास सहा दिवस रक्तगटाची वाट पाहत होती. चांदणीला A2B (A2B positive blood) हे दुर्मिळ रक्त हवे होते. संपूर्ण जगाच्या लोकसंख्येपैकी फक्त ०.६-१.४% लोकांमध्ये हा रक्तगट आहे.

A2B हा दुर्मिळ रक्तगट असलेले हितेश अरोरा म्हणाले की, रक्तदान करण्यासाठी प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मी नियमित रक्तदाता आहे. काही वर्षांपूर्वी मला सांगण्यात आले होते की, माझा रक्तगट B+ve आहे. मात्र त्यानंतर वर्षापूर्वी एका रक्तदान शिबिरात माझा रक्तगट एक दुर्मिळ रक्तगट असल्याचे सांगितले. म्हणून, मी भोपाळच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेत गेलो आणि याची पुष्टी केली.

हितेश यांचा रक्तगट A2B हा AB रक्तगटाचा दुर्मिळ उप-गट आहे. एक सजग रक्तदाता असल्याने, अरोरा यांनी दुर्मिळ रक्तदात्यांच्या प्लॅटफॉर्मवर स्वतःची नोंदणी करण्याचा प्रयत्न केला.

वाचा- बापजन्म! खुनाचा आरोपी पॅरोलनंतर १२ वर्ष फरार राहिला, मुलींचं शिक्षण पूर्ण होताच केलं आत्मसमर्पण

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गटाचा उल्लेख अनेक मोठ्या नोंदणींमध्ये नव्हता. मला फक्त एक आंतरराष्ट्रीय ऑनलाइन नोंदणी सापडली जिथे या रक्तगटाचा उल्लेख केला होता. तेव्हापासून मी गरजू रुग्णांना तीनदा रक्तदान केले आहे, असे हितेश म्हणाले. या आंतरराष्ट्रीय रजिस्ट्रीवरून नागपूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांना हितेश यांचा संपर्क सापडला. अरोरा म्हणाले की, त्यांनी शेवटचे रक्तदान एप्रिल २०२२ मध्ये केले आणि रीवा येथील एका तरुणीला वाचवले होते.

नागपूरच्या सेवा फाऊंडेशन या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णांना मदत करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी सांगितले की, त्यांना पहिल्यांदाच या रक्तगटाची मागणी आली.

वाचा- १ रुपयांत नाष्टा, १० रुपयांना जेवण; गरजूंसाठी तृतीयपंथीयांची कल्याणमध्ये आगळीवेगळी सेवा

कधीकधी आम्हाला बॉम्बे रक्तगटांची मागणी येते, जे दुर्मिळ मानले जातात. आमच्याकडे देणगीदारांची यादी आहे. बहुतेक वेळा, आम्ही या यादीसह बॉम्बे रक्तगट व्यवस्था करतो. परंतु, गेल्या आठवड्यात, आम्हाला अत्यंत दुर्मिळ A2B पॉझिटिव्ह रक्तगट आढळला, असे सेवा फाउंडेशनचे पुरुषोत्तम भोसले म्हणाले. आम्ही संपूर्ण विदर्भात या रक्तगटाच्या दात्याचा शोध पथकाने घेतला होता.

वाचा- ८ लाखांचे श्रवणयंत्र मिळाले मोफत; दुर्मिळ व्याधी असलेल्या रौनकसाठी धावले केईएमचे डॉक्टर

प्रथम, मी गोंदिया आणि नागपूरच्या दोन्ही सरकारी रुग्णालयांच्या अधिकाऱ्यांकडून पुष्टी केली की केस खरी आहे. मग मी माझ्या नागपूरच्या प्रवासाचे नियोजन केले, असे अरोरा म्हणाले.

अरोरा यांनी स्वखर्चाने प्रवास केला आणि नागपूरला पोहोचले. सेवा फाउंडेशनच्या सदस्यांनी त्यांचे रेल्वे स्थानकावर स्वागत केले आणि थेट GMCH नागपूर येथे आणले. अरोरा यांची भोपाळला जाण्यासाठी ट्रेन असल्याने डॉक्टरांनी रक्तदानाची औपचारिकता २ तासांत पूर्ण केली. चांदणीला भविष्यात तिला रक्ताची गरज भासल्यास तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.