म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: नातेवाईकाच्या अस्थी विसर्जनासाठी गेलेले चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे (वय ४७), त्यांचा मुलगा चेतन गोविंदा पोडे (वय १६) आणि भाचा गणेश रवींद्र उपरे (वय १७) या तिघांचा रविवारी वर्धा-इरई नदीत बुडून मृत्यू झाला आहे. दरम्यान, या तिघांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून इतर दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नांदगाव (पोडे) येथील घनश्याम पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी पोडे कुटुंबीय रविवारी वर्धा-इराई नदीच्या संगमावर गेले होते. पूजेनंतर अस्थी विसर्जन करण्यात आले. यावेळी चेतन पोडे व गणेश उपरे हे नदीत पोहत असताना वाहून गेले. त्यांना वाचवण्यासाठी गोविंदा पोडे यांनी नदीपात्रात उडी घेतली. मात्र, पाण्याच्या प्रवाहात तेदेखील वाहून गेले.

माहिती मिळताच पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, बल्लारपूरचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील, चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीशसिंह राजपूत, बल्लारपूरच्या तहसीलदार डॉ. कांचन जगताप आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीने बचावकार्य सुरू केले.
Read Latest Maharashtra News And Marathi News