सरकारस्थापनेबद्दल शिवसेनेचा काही अडसर नाही:वरीष्ठ घेतील तो निर्णय मान्य हे शिंदेंनी आधीच स्पष्ट केले- संजय शिरसाट
एकनाथ शिंदे यांनी सरकारबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वरीष्ठ नेत्यांना जो निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यनेता म्हणून माझी त्याला संमती असेल असे त्यांनी स्पष्ट केल्याचे शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. दरम्यान संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, महायुतीमध्ये काही ताण तणाव नाही. विधानसभेच्या निकालानंतर मानसिक संतूलन कुणाचे बिघडले हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. ठाकरे गटाचा एकही नेता यावर बोलत नाही. त्यांना त्यांची चूक समजली आहे. पण हा चारही घरचा पाहूण्याला त्यांचा नेता कोण माहीत नाही. ज्याला फक्त शेपुट हलवणे म्हणतात तसेच नेते अशी टीका करू शकतात म्हणत त्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे नेते नाही भाडेकरू बोलतात संजय शिरसाट म्हणाले की, ठाकरे गटातील एकही नेता आता बोलत नाही, हे भाडेकरु सर्वकाही बोलत आहे, असे म्हणत शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. पोटात एक अन् ओठात एक अशी आमची संस्कृती नाही. आम्ही लाचारासारखे नाटके करणारे नाही. आमच्या चेहर्यावर असणारेच आम्ही ओठावर आणू. तर आम्ही नाराज असलो तरी ते उघडपणे जाहीर करू. दोन दिवसात भाजपचा गटनेता निवडला जाईल संजय शिरसाट म्हणाले की, भाजपचे पक्ष निरीक्षक दोन दिवसांनी महाराष्ट्रात येणार आहेत, त्यानंतर ते भाजपच्या गटनेत्याचे नाव जाहीर करतील. एकनाथ शिंदे दरे गावला का गेले, त्यांना वेगळा निर्णय घ्यायचा का?, त्यांची तब्बेत बरी नाही का हे समजण्याचे काही कारण नाही. एकनाथ शिंदे यांनी सत्ता सोडताना दिलेर पणाने सत्ता सोडली. सीएमपदाबाबत मोदी-शहांचा निर्णय अंतिम संजय शिरसाट म्हणाले की, राज्यातील परिस्थिती पाहून आता कुणाला मुख्यमंत्री करायचे हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा असणार आहे. त्या निर्णयाला का वेळ लागतोय याबद्दल आम्हाला काही माहीती नाही. जो पर्यंत मुख्यमंत्री ठरत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाचे खाते वाटप ठरू शकत नाही. त्यामुळे इतर खात्यावर चर्चा झाल्याची काही माहिती नाही. सरकार वाऱ्यावर सोडलेले नाही संजय शिरसाट म्हणाले की, काही लोकांना राजकारणाशी काही देणं-घेणं नाही. ते पावसाळ्यात उगवलेल्या सारखे ते उगावले आहेत, कधी त्यांचा अंत होईल हे सांगता सयेत नाही. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहे असे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्यांनी सरकार काही वाऱ्यावर सोडले नाही. योग्य पद्धतीने काम सुरू आहे. भाजपचा सीएमपदाबाबत निर्णय का नाही माहिती नाही संजय शिरसाट म्हणाले की, एकनाथ शिंदे हे दरेगावी जात असतात. त्यांना मोठा निर्णय घ्यावा वाटला की ते दरेगावी जातात. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सरकार स्थापनेसाठी मी कोणता अडसर आणाणार नाही, वरीष्ठ जो निर्णय घेतील तो आमच्या पक्षाला मान्य राहील असे सांगितले. दिल्लीतही त्यांनी आपण निर्णय घ्याचे असे वरीष्ठांना सांगितले आहे. या सर्वानंतर भाजप अजून मुख्यमंत्री का ठरवत नाही हे माहीत नाही. ठाकरे गटाची घर का ना घाट का अशी परिस्थिती संजय शिरसाट म्हणाले की, ठाकरे गटाची घर का ना घाट का अशी परिस्थिती झाली आहे. गेली दोन दिवस त्यांचे आणि काँग्रेसचे किती प्रेम आहे हे दिसून येत आहे. तर एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊ नका आम्ही येतो असे त्यांनी दिल्लीत कुणाच्या मध्यस्थीने सांगितले हे आम्हाला माहिती आहे. जनतेने गद्दारांना अन् लाचारांना त्यांची जागा दाखवली.