पत्नीचे पाठबळ अन् सोडली नोकरी
इन्फोइजचे मालक अब्जाधीश उद्योगपती संजीव बिखचंदानीच्या कंपनीने इतर अनेक व्यवसायातही गुंतवणूक केली आहे. शालेय जीवनापासून संजीव बिकचंदानी यांना स्वतःचे काहीतरी करण्याची इच्छा होती. नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणं तितकं सोपं नव्हते त्यामुळे ते तन्मयतेने काम करत राहिले आणि त्यासोबतच व्यवसायाचे नियोजनही करत राहिले.
पत्नीच्या पगारातून घरखर्च भागवला
आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी संजीव बिकचंदानी यांना पत्नी सुरभी यांनी खूप साथ दिली. संजीव आणि सुरभी या दोघांनी लग्नापूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबादमध्ये शिक्षण घेतले होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर संजीव प्रसिद्ध कंपनी ग्लॅक्सोस्मिथक्लाइनमध्ये रुजू झाले आणि अखेर १९९० मध्ये संजीव यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
संजीव बिकचंदानी सांगतात की, मी स्वत:ला भाग्यवान समजतो कारण जेव्हा सुरभीने नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती काम करत होती. अशा कठीण काळात सुरभीला मिळालेल्या पगाराने तिला कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची हिंमत दिली. खरं तर व्यवसाय सुरू केल्यानंतर अनेक वर्षे संजीव बिकचंदानी यांना फारसे उत्पन्न मिळाले नाही.
७ वर्षानंतर पदरात यश पडले
१९९० मध्ये संजीव यांनी वडिलांच्या गॅरेजमध्ये सेकंड-हँड संगणक आणि फर्निचरसह इन्फो एज (इंडिया) ची सुरूवात केली. बिकचंदानीच्या व्यवसायाला १९९७ कलाटणी मिळाली जेव्हा त्यांनी Naukri.com ची सुरूवात केली, ज्याला प्रचंड यश मिळाले. याशिवाय त्यांनी jeevasathi.com, 99acres.com, shiksha.com ही इतर प्रमुख वेब पोर्टल्सही सुरू केली. तर झोमॅटो आणि पॉलिसीबाजार सारख्या कंपन्यांमध्ये त्यांची हिस्सेदारी आहे.
डीएनए अहवालानुसार इन्फो एज इंडियाचे मार्केट कॅप सध्या ५७ हजार ५०० कोटी रुपये असून फोर्ब्स मासिकानुसार संजीव बिकचंदानी यांची एकूण संपत्ती २.३ अब्ज डॉलर (सुमारे १९ हजार कोटींहून अधिक) आहे.