महायुतीत सीएमपदावरुन रस्सीखेच नाही:निरीक्षक आले की भाजपचा गटनेता निवडला जाईल, मग सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा- चंद्रशेखर बावनकुळे

महायुतीत सीएमपदावरुन रस्सीखेच नाही:निरीक्षक आले की भाजपचा गटनेता निवडला जाईल, मग सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा- चंद्रशेखर बावनकुळे

पक्षाचे निरीक्षक तर राज्यात येणारच आहे. 5 तारखेला संभाव्य मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे. यात काही वावड्या डठवण्याची गरज नाही. निरीक्षक आले की नेते निवडले जातील, त्यातून सरकारचा मार्ग मोकळा होईल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, कोणत्याही सरकार स्थापनेबद्दल चर्चा ह्या बातम्या आणि माध्यमांतील चर्चेवर होऊ शकत नाही. जो निर्णय घेतील तो देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे मिळून घेतील आणि त्याला आमचे केंद्रीय नेतृत्व मान्यता देईल. कुणी मिडीयाला काही बोलले तर सरकार स्थापन होत नसते असेही त्यांनी म्हटले आहे. राऊत अस्वस्थ मानसिकतेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत हे सध्या अस्वस्थ आहेत. त्यांचे आमदार कमी झाले. त्यांना कुणी विचात नाही. काँग्रेस आपला वेगळा विचार करत आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. अशा मानसिकतेमध्ये लोकं असेच बोलतात. स्वस्थ मानसिकतेमध्ये राऊत आले की त्यांचे आम्ही ऐकू. 2029 पर्यंत विरोधीपक्षाने तयारी करावी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नागपूरमधील विरोधी पक्षनेत्याचा बंगला कुणाला देणार हे आम्हाला माहिती नाही. पण माझी मविआतील नेत्यांना विनंती राहणार आहे मी त्यांना सूचना देणार नाही, 2029 मध्ये तिघांपैकी कुणाकडे तरी विरोधीपक्षनेते पद राहील याची काळजी घ्यावी. ऐवढी तयारी त्यांनी 2029 पर्यंत केली पाहिजे. विरोधकांकडून वेळकाढू पणा चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीमधील तिन्ही पक्षात कुठेच रस्सीखेच नाही. अजितदादा आणि आमच्यात कुठेच रस्सीखेच नाही. आम्ही मिडीयात एक अन् तिकडे एक बोलतो असे काही नाही. आम्ही तिघे सख्ये भाऊ एकत्र आहोत. सावत्र भाऊ हे EVM वर बोट ठेवत वेळकाढू पणा करत आहे, असे म्हणत त्यांनी मविआवर टीकास्त्र डागले आहे. एकनाथ शिंदे हे प्रगल्भ नेते आहेत, त्यांच्याबद्दल वेगळ्या बातम्या पसरवणे योग्य नाही.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment