मुंबई: देशातील मोठे उद्योगपती आणि प्रेकणादायी व्यक्तीमत्व रतन टाटा यांच्या आयुष्य आता चित्रपटातून सर्वांसमोर येणार आहे. टाटांच्या आयुष्यावर बायोपिक येणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. या चित्रपटात रतन टाटा यांच्याबद्दलच्या माहीत नसलेल्या गोष्टी दाखवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
जिनिलिया देशमुखची मराठी चित्रपटात जबरदस्त एन्ट्री, प्रत्येकाला ‘वेड’ लावणारा टिझर

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय पुरस्कार विजेती दिग्दर्शक सुधा कोंगरा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटाचं शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. चित्रपटासाठी अनेक दिवस रिसर्चचं काम सरू होतं.अखेर हे रिसर्चचं काम संपलं असल्याचं समजतं.

सुधा कोंगरा या चित्रपटासाठी प्रचंड उत्साहीत असल्याचं समजतं. रतन टाटा यांच्या सारख्या व्यक्तीचा बायोपिक दिग्दर्शित करणं हे स्वप्न होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
आलिया-रणबीरच्या लेकीचं नाव ठरलं, पहिल्यांदाच ऐकलं असेल इतकं हटके नाव
असं म्हटलं जात आहे की, रतन टाटा यांच्या आयुष्यातील अनेक खास गोष्टी या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यांच्याबद्दल माहीत नसेलल्या गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतील, असं म्हटलं जात आहे. निर्मात्यांनी संहितेवर काम सुरू केल्याचं म्हटलं जात आहे.

अभिनेता कोण?
रतन टाटा यांच्या बायोपिकसाठी सध्या दोन नावांची जोरात चर्चा सुरू आहे.
अभिनेता अभिषेक बच्चन आणि दाक्षिणात्य अभिनेता सूर्या यांची नावं चर्चेत आहेत. याबद्दल अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीए.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *