तर शरद पवार, उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक ठरेल:चंद्रशेखर बावनकुळे यांचा मविआवर निशाणा; राहुल गांधी यांच्यावरही टीका

तर शरद पवार, उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक ठरेल:चंद्रशेखर बावनकुळे यांचा मविआवर निशाणा; राहुल गांधी यांच्यावरही टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालतात आणि देवेंद्र फडणवीस चालत नाही, यावरूनच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे खरे राजकारण समोर आले असल्याचे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस चौदा कोटी जनतेच्या मनात आहेत. त्यामुळे देवेंद्रजी आणि भाजप सत्तेत आले तर आपली डाळ शिजणार नाही, आपला जातिवाद चालणार नाही, यामुळेच त्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. फडणवीस पुन्हा आले तर शरद पवार, उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक ठरेल, या भीतीतूनच सुप्रिया सुळे असा आरोप करत असल्याचे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे. शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं, अशी टॅगलाईन देत प्रवक्त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक होण्याच्या सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती. यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला आहे. आतापर्यंत जातीवादाचे राजकारण महाविकास आघाडीतील घटक पक्ष करत आले आहे. त्यांना तेच राजकारण बंद पडण्याची भीती असल्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्यावरही साधला निशाणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला. मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना त्यांनी शिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला होता, त्याला राहुल गांधी उत्तर देतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पंडित नेहरूंच्या पुस्तकात देखील शिवाजी महाराजांच्या बाबत केलेल्या उल्लेखावर राहुल गांधी का बोलत नाही? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. त्यासाठी राहुल गांधी यांनी माफी मागायला हवी होती. राज्य शासनाने महिला भगिनींना सन्मान दिला आहे. म्हणूनच हा खोटारडापणा सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मात्र काँग्रेसचा हा खोटारडेपणा, ही जुनी कॅसेट आता चालणार नाही, अशी टीका देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

​मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालतात आणि देवेंद्र फडणवीस चालत नाही, यावरूनच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे खरे राजकारण समोर आले असल्याचे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस चौदा कोटी जनतेच्या मनात आहेत. त्यामुळे देवेंद्रजी आणि भाजप सत्तेत आले तर आपली डाळ शिजणार नाही, आपला जातिवाद चालणार नाही, यामुळेच त्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. फडणवीस पुन्हा आले तर शरद पवार, उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक ठरेल, या भीतीतूनच सुप्रिया सुळे असा आरोप करत असल्याचे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे. शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं, अशी टॅगलाईन देत प्रवक्त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक होण्याच्या सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती. यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला आहे. आतापर्यंत जातीवादाचे राजकारण महाविकास आघाडीतील घटक पक्ष करत आले आहे. त्यांना तेच राजकारण बंद पडण्याची भीती असल्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्यावरही साधला निशाणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला. मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना त्यांनी शिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला होता, त्याला राहुल गांधी उत्तर देतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पंडित नेहरूंच्या पुस्तकात देखील शिवाजी महाराजांच्या बाबत केलेल्या उल्लेखावर राहुल गांधी का बोलत नाही? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. त्यासाठी राहुल गांधी यांनी माफी मागायला हवी होती. राज्य शासनाने महिला भगिनींना सन्मान दिला आहे. म्हणूनच हा खोटारडापणा सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मात्र काँग्रेसचा हा खोटारडेपणा, ही जुनी कॅसेट आता चालणार नाही, अशी टीका देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment