इस्त्राइलच्या पुरातत्व विभागाच्या एका पथकाने एका प्राचीन गुहेचा शोध लावला आहे. ही गुहा मिस्त्रचा बादशहा फिरौन द्वितीयच्या काळातील असल्याचं सांगितलं जात असून ती ३ हजार ३०० वर्ष जुनी असल्याचं कळतंय. इस्त्राइल एँटीक्यूटीज ऑथॉरिटी (IAA)च्या टीमला या गुहेत अनमोल खजिना मिळाला आहे.

पुरातत्व विभागाने शोधून काढलेल्या गुहेत मातीच्या भांड्याचे तुकडे आणि कांस्य धातूच्या काही कलाकृती सापडल्या आहेत. तज्ज्ञांनी याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर या सर्व वस्तू मिस्त्रच्या राजाच्या असून १२१३ इसवीसनपूर्वी त्यांचे मिस्त्रवर राज्य होते. टीमने या गुहेचा एक व्हिडिओ रविवारी जारी केला असून या याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

ही गुहा एका समुद्र किनाऱ्यालगत असून एक प्लामाहिम नॅशनल पार्कच्या छताचे काम करत असताना एका मॅकेनिकच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यानं संबंधित अधिकाऱ्यांना या बाबत सांगितलं. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पायऱ्यांच्या मदतीने याचे निरीक्षण करत असताना त्यांना चौकोनी आकाराच्या या गुहेबाबत माहिती पडलं. इस्त्राइलच्या टीमने जारी केलेल्या एका व्हिडिओत डझनभर मातीची भांडी दिसत आहेत.

वाचाः मुख्यमंत्र्यांची ४० आमदारांसह आज दिल्लीवारी; केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेणार

ही भांडी वेगवेगळ्या आकाराची आहेत. टीमला काही वाट्या सापडल्या आहेत ज्यांना लाल रंग देण्यात आला आहेत. त्यात काही हाडांचे तुकडेही सापडले आहेत. त्याचबरोबर, पाण्याचे पेले, जेवण शिजवण्याची भांडी, जार, लँप, कांस्य तीर व भाले यासारखं सामानही पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडलं आहे. दरम्यान, हे सर्व सामान एखादा व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंतिम यात्रेत व त्यांला दफन करतात त्याजागी ठेवतात. ही गुफा आणि त्यातील सामान ३, ३०० वर्षांपूर्वी ठेवण्यात आलं असून आजपर्यंत त्यांना कोणीही हात लावलेला नाहीये.

वाचाः मोठी बातमी! नाशिकमध्ये शिवसेनेच्या गडाला हादरे; डझनभर माजी नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात

या गुहेत एक सांगाडा सापडला असून तो गुहेच्या बाजूला असलेल्या दोन चौकोनी प्लॉटमध्ये सापडला आहे. ही गुहा कांस्ययुगातील अंत्यसंस्काराच्या विधींचे अधिक अचूक चित्र आहे,” असे IAA तज्ञ अली यानाई यांनी सांगितले. ही एक विलक्षण घटना आहे आणि असा शोध आयुष्यात एकदाचलागतो. या गुहेत काही अवशेष सीलबंद अवस्थेतही सापडू शकतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ही गुहा कनानचे नियंत्रण करणाऱ्या रेमेसेझी द्वीतीयच्या कारकिर्दीतील आहे. तो प्रदेश आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये येतो.

वाचाः आता महिलांसाठी लोकलही नाही सुरक्षित; फेरीवाल्याकडून लोकलमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंगSource link

Leave a Reply

Your email address will not be published.