अमरावती : अमरावती जिल्ह्यात महिला व मुलींवर सातत्याने अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे दिसत आहे. दर्यापूर येथे शिक्षणासाठी येण्याचे ग्रामीण भागांमधील मुलींचे प्रमाण मोठे आहे. मात्र, याच गोष्टीचा गैरफायदा घेत काही टवाळखोर वृत्तीचे युवक मुलींना लक्ष्य करत असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना शहरात घडली आहे. शहरातील एका मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या एका २४ वर्षीय युवतीचा पाठलाग करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. शेख इम्रान शेख इसूफ ( वय ३६ वर्षे, रा. टाटानगर, दर्यापूर) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. (A young man molested a temple-going girl in Amravati)

घटनेतील फिर्यादी युवती मागील आठ ते दहा दिवसांपासून शहरातील एका महादेव मंदिरात दर्शनासाठी जात असायची. शेख इम्रान ती मंदिरात जाताना व येताना पाठलाग करत असल्याचे निदर्शनास आले. बदनामीच्या भीतीपोटी युवतीने ही बाब घरी न सांगता काही दिवस मंदिरात जाणे बंद केले होते. त्यानंतर ती नेहमीप्रमाणे मंदिरात जात असताना शेख इम्रान हा युवतीचा पाठलाग करत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. याबाबत मात्र तीने घरी आई व भावाला माहिती दिल्यावर त्यांना धक्का बसला.

क्लिक करा आणि वाचा- मासे पकडण्यासाठी टाळलेल्या जाळ्यात स्वत:च अडकले; तीन मच्छिमारांचा करुण अंत

या घटनेनंतर संतापलेल्या युवतीच्या भावासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ गाठून युवतीचा विनयभंग करणाऱ्या शेख इम्रान याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत शेख इम्रान याला अटक करण्यात आली.

क्लिक करा आणि वाचा- गुरांना चारा देण्यास गेलेला शेतकरी परतलाच नाही, नाल्यात बाईक दिसली; भावानं घेतली उडी, तर…

शेख इम्रान याने नेहमीप्रमाणे युवतीचा पाठलाग केला. इतकेच नव्हे, तर तिचा हात पकडून ओढणी ओढून विनयभंग केला. या प्रकाराने संतापलेल्या युवतीने दर्यापूर पोलिस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध फिर्यादी नोंदवली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुमिता चोरघे करीत आहे.

क्लिक करा आणि वाचा- अमरावती: कॉलेजमध्ये सापाचा खेळ करताना दंश; रक्तबंबाळ हाताचा फोटो स्टेटसवर ठेवला अन् मग…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.