याबाबत अनुराग ठाकूर म्हणाले की, “बीसीसीआयने आधीच निर्णय घेतला आहे की जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडील दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत भारत त्यांच्याशी द्विपक्षीय सामने खेळणार नाही. हे भारतीय नागरिकांच्या भावनांशी सुसंगत आहे. त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला मदत करणे ठांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारचे क्रिकेट सामने आम्ही खेळणार नाही.”
आता काही दिवासंनी वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वी आता अनुराग ठाकूर यांनी हा पवित्रा घेतला आहे. पण वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार की नाही, याबाबत मात्र चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे. अनुराग ठाकूर यांनी जेव्हा आपली भूमिका मांडली, त्यामध्ये त्यांनी वर्ल्ड कपबााबत कोणीतेही मत व्यक्त केले नाही. वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा १४ ऑक्टोबरला होणार आहे. पण ठाकूर यांनी जो पवित्रा घेतला आहे, त्यामुळे हा सामना होणार की याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पण अनुराग ठाकूर हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विदेशीय क्रिकेट मालिकाबद्दल बोलत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो, असे दिसत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून द्विदेशीय मालिका झालेली नाही. आता ती लवकर होईल, अशी चिन्हंदेखील दिसत नाहीत. त्यामुळे आता पाकिस्तान याबाबत काय मत व्यक्त करते, याकडे क्रिकेट विश्वातील सर्व चाहत्यांचे डोळे लागलेले असतील यात शंकाच नाही.