नवी दिल्ली: बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनने श्रीलंकेचा ऑलराउंडर अँजेलो मॅथ्यूजला टाइम आउट नियमानुसार बाद करण्याची अपील केली. या घटनेनंतर क्रिकेटमध्ये एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे शाकीबने खेळभावना दाखवली पाहिजे होती. आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टाइम आउटने बाद होणारा मँथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला. ही मॅच बांगलादेशने ३ विकेटनी जिंकली. या पराभवासह श्रीलंका सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर झाली.

सामना झाल्यानंतर जेव्हा शाकीब पत्रकार परिषदेत आला तेव्हा त्याला अपेक्षेप्रमाणे टाइम आउट वादावर प्रश्न विचारण्यात आला. शाकीबला त्याच्या कृतीबद्दल कोणताही पश्चाताप नव्हता, कारण तो नियमानुसार वागला. जेव्हा मॅच थांबली होती तेव्हा एका फिल्डरने येऊन मला सांगितले की, अंपायरकडे अपील करता येईल कारण बराच वेळ झाला आहे आणि आम्ही आउटची अपील केली. मी त्याला (मँथ्यूज) १९ वर्षाखालील क्रिकेटपासून ओळखतोय. त्याने मला अपील मागे घेण्यास सांगितले. पण मी त्याला इतकेच म्हटले की, मी तुझी स्थिती समजतो पण हे नियमानुसारच आहे.

श्रीलंका-बांगलादेशचे खेळाडू एकमेकांच्या अंगावर गेले, हाणामारीची वेळ; मॅच झाल्यानंतर पाहा झाले तरी काय
शाकीबला जेव्हा खेळभावनेशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, आयसीसीने नियम बदलला पाहिजे. तुम्हाला जर खेळ भावना हवी असेल तर आयसीसीने यावर विचार केला पाहिजे आणि नियम बदलावा.

सेमीफायनलमध्ये पाकिस्तान असो वा न्यूझीलंड जो संघ असेल त्याच्यासोबत असेच होईल; भारतीय संघाच्या कोचचे मोठे वक्तव्य
श्रीलंकेच्या डावात झालेल्या या घटनेनंतर मॅच ही नेहमी सारखी झाली नाही. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये तणाव दिसत होता. बांगलादेशच्या डावात जेव्हा मँथ्यूजने शाकीबला बाद केले तेव्हा त्याने टाइम आउटची आठवण करून दिली. अखेरीस जेव्हा मॅच संपली तेव्हा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हात देखील मिळवले नाही.

मॅचमध्ये बांगलादेशने टॉस जिंकून श्रीलंकेला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. लंकेने ४९.३ षटकात सर्वबाद २७९ धावा केल्या. विजयाचे लक्ष्य बांगलादेशने ४१.१ षटकात ७ विकेटच्या बदल्यात पार केले.

Read Latest Sports News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *