जर एखादा खेळाडू नियमांचे पालन करणार असेल तर त्याला तशी परवानगी दिली पाहिजे, असे द्रविड यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइम आउट होणारा मॅथ्यूज हा पहिला फलंदाज ठरला आहे. मॅथ्यूज फलंदाजीला आल्यावर त्याच्या हेल्मेटचे स्ट्रेप तुटले होते आणि त्याने नवे हेल्मेट मागवले. या दरम्यान बराच वेळ गेल्याने बांगलादेशने टाइम आउटची अपील केली.
या संपूर्ण प्रकरणावर बराच वाद झाला. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना द्रविड म्हणाले, प्रत्येकाचा स्वत:चा विचार असतो. आपण स्वतंत्र प्राणी आहोत आणि प्रत्येकाचे स्वत:चं डोकं आणि विचार असतात. प्रत्यक्षात हे बरोबर आणि चूक असे नसते. अशा प्रकारचे मतभेद होणे चांगले असते. जर कोणी नियमांचे पालन करणार असेल तर मला वाटते नाही की त्यावरून कोणाला तक्रार असावी. कारण मी अगदी प्रामाणीकपणे सांगायचे तर तो फक्त नियमांचे बालन करत होता हे आपण सर्वांनी पाहिले आहे. तुम्हाला असे वाटत असेल की त्याने असे करायला नको होते. पण नियमांचे पालन करतोय म्हणून तुम्ही कोणाला दोषी ठरवू शकत नाही.
दरम्यान भारताची अखेरची साखळी लढत नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. या लढतीत आम्ही प्लेइंग इलेव्हन आणि पीच यावर फोकस न करता फक्त मॅचकडे पाहतोय. आम्हाला ६ दिवसांचा ब्रेक मिळालाय, त्यामुळे खेळाडू फ्रेश आहेत. भारताने पहिल्या ८ पैकी ८ लढती जिंकून याआधीच सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. आता नवव्या लढतीत विजयाची ही मालिका काय ठेवण्यास रोहित सेना उत्सुक असेल.
Read Latest Sports News And Marathi News