श्रीलंकेच्या डावातील २५व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर समरविक्रम बाद झाला. त्याच्या जागी अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीला आला. पण चेंडू खेळण्यास येण्याआधी त्याचे हेल्मेट खराब झाल्याचे लक्षात आले आणि त्याने ड्रेसिंग रुममधून दुसरे हेल्मेट मागवले. यात २ मिनिटांचा वेळ गेल्याने बांगलादेशचा कर्णधार शाकीबने टाइम आउटची अपील केली. यावर दोन्ही संघातील खेळाडू आणि अंपायर सोबत वाद झाल्यानंतर अखेर मॅथ्यूजला बाद देण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने बाद होणारा ते पहिला फलंदाज ठरला.
या घटनेनंतर शाकीबवर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे. तर शाकीबच्या मते त्याने जे काही केले ते नियमानुसार केले. पण चाहत्यांच्या मते शाकीबने खेळभावना दाखवायला हवी होती. काहींनी शाकीबच्या हुशारीचे कौतुक केले की त्याने नियम लक्षात ठेवला आणि त्याचा वापर केला. पण प्रत्यक्षा या वादात शाकीबवर टीका होत असली तरी मँथ्यूज विरुद्ध टाइम आउटची मागणी शाकीबच्या डोक्यातून आली नाही.
मॅच झाल्यानंतर पत्रकार परिषदेत शाकीबने सांगितले की,नवा फलंदाज मैदानात आल्यानंतर बराच काळ झाला होता. जर आपण टाइम आउटची मागणी केली तर मॅथ्यूज आउट होऊ शकतो. मग शाकीबने बाद अंपायर्सकडे अपील केली. मैदानात शाकीबला या नियमाची आठवण करून देणारा बांगलादेशचा खेळाडू अन्य कोणी नाही तर नजमुल हुसेन शांतो होता. ज्या टाइम आउटवरून कालपासून इतका गदारोळ सुरू आहे त्याचा खरा व्हिलन शाकीब नसून शांतो आहे.
मँथ्यूजसोबत जो प्रकार झाला त्याचा परिणाम पुढे संपूर्ण मॅचमध्ये जाणवला. दोन्ही संघातील तणाव मॅच संपेपर्यंत दिसला. अखेर बांगलादेशने मॅच जिंकल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी हात देखील मिळवला नाही.
Read Latest Sports News And Marathi News