सोलापूर : राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शेखर बंगाळे या सामाजिक कार्यकर्त्याने शुक्रवारी सकाळी रेस्ट हाऊसमध्ये भंडारा उधळला. भंडारा उधळल्याबरोबर भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पोलिसांसोबत शेखरला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नरेंद्र काळेंवर सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. “शहराध्यक्ष नरेंद्र काळे हे सुद्धा धनगर समाजाचे नेते आहेत. नरेंद्र काळे स्वतः धनगर समाजाचे असूनही धनगर समाजाच्या युवा नेत्याला मारहाण करतात”, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या. तसेच याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी होऊ लागल्याने मारहाणीनंतर नरेंद्र काळेंनी सोशल मीडियावर धनगर समाजाची जाहीर माफी मागितली.

भाजप शहराध्यक्षांचा माफीनामा

नरेंद्र काळे स्वतः शेखर बंगाळेला महसूलमंत्री विखे पाटील यांच्याकडे निवेदन देण्यासाठी घेऊन गेले होते. धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वय शेखर बंगाळे यांनी खिशातून काय काढले, हे मला समजले नाही. त्या झटापटीत माझ्याकडून अनावधनाने काही गोष्टी झाल्या. त्याबद्दल धनगर समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी समस्त धनगर समाजाची माफी मागतो. धनगर समाजातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी या गोष्टीचं भांडवल करू नये. झालेल्या चुकीबद्दल मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी माफी मागितली. धनगर समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी समस्त धनगर समाजाची माफी मागतो. मी जसा भारतीय जनता पक्षाचा सोलापूर शहराध्यक्ष आहे, तसाच सर्वात आधी धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे. समाजाच्या चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे, असेही काळे यांनी स्पष्ट केले.

खिशातून गुपचूप रुमाल बाहेर काढला अन् डाव साधला; विखे-पाटलांवर भंडाऱ्याची उधळण करणारा शेखर बंगाळे कोण?
स्वतःच्या जबाबदारीवर पालकमंत्र्यांकडे शेखरला घेऊन गेलो

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आले होते. शेखर बंगाळे हा शुक्रवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात विखे पाटलांना निवेदन देण्यासाठी आला होता. सुरक्षा रक्षक शेखरला आतमध्ये सोडत नव्हते. नरेंद्र काळे यांनी स्वतः सुरक्षा रक्षकांना सांगितले, शेखरला सोडा. भाजप शहर अध्यक्षांनी स्वतःच्या जबाबदारी निवेदन देण्यासाठी विखे पाटलांजवळ आणलं होतं. शेखरने निवेदन दिल्यानंतर अचानक खिशातून भंडारा काढला आणि विखे पाटलांच्या अंगावर फेकला.

विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळला, धनगर समाजाच्या आरक्षणावरुन कार्यकर्ता आक्रमक, पोलिसांनी घेतलं ताब्यात!Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *