रांची: नोकरीसाठी २५ वर्षीय तरुणाने आपल्याच वडिलांच्या हत्येचा कट रचल्याची भयंकर घटना घडली आहे. आरोपी तरुणाने वडिलांच्या हत्येसाठी कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी दिल्याची माहिती आहे. हे प्रकरण झारखंडचे असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.झारखंडच्या रामगढ जिल्ह्यातील रामजी मुंडा हे सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड (CCL) मध्ये काम करतात. अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी म्हणून रामजीच्या मुलाने वडिलांच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी त्यांने कॉन्ट्रॅक्ट किलरही नेमले.१६ नोव्हेंबर रोजी रामगढमध्ये अज्ञात दुचाकीस्वारांनी भरदिवसा रामजीवर गोळीबार केला. यानंतर रामजी यांना गंभीर अवस्थेत रामगढ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्यांना रांचीला रेफर करण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान या हल्ल्यामागे रामजी यांचा मुलगा अमित मुंडा असल्याचे पोलिसांना समजले. यानंतर पोलिसांनी अमितला अटक केली. पोलिसांनी आता हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेही टाकले आहेत.खरेतर, CCL ही कोल इंडिया लिमिटेड (CIL) ची उपकंपनी आहे, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा त्याच्या सेवेच्या कालावधीत मृत्यू झाला, तर त्याच्यावर कायदेशीर अवलंबून असलेल्या व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी देण्याची तरतूद आहे. याआधी नोव्हेंबर २०२० मध्ये, एका ३५ वर्षीय बेरोजगाराने वडिलांच्या नोकरीसाठी बरखाखाना येथील सीसीएल वर्कशॉपमध्ये तैनात असलेल्या ५५ वर्षीय सुरक्षा रक्षक वडिलांची त्याच्या क्वार्टरमध्ये गळा चिरून हत्या केली होती. Read Latest And