नको असलेल्या फोन कॉल्सपासून सुटका करून घेण्यासाठी ‘इमर्जन्सी’ तरतुदीचा खोडा:1 सप्टेंबरपासून देशात लागू होणार ट्रायची मार्गदर्शक तत्त्वे

नको असलेल्या कॉलमुळे त्रस्त मोबाइल ग्राहक १ सप्टेंबरपासून सुटकेचा नि:श्वास घेऊ शकतात. अट एवढीच आहे की, पांढऱ्या यादीत (सुरक्षित क्रमांक) समाविष्ट कंपन्यांनी आणीबाणीच्या स्थितीचा गैरफायदा घेत ब्लाॅक क्रमांक रिॲक्टिव्ह करू नये. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) सध्या हीच समस्या सोडवण्याच्या मागे लागले आहे.
दूरसंचार नियामक ट्रायने बीएसएनएल, आयडिया-व्होडाफोन, एअरटेल, जिअोसह सर्व टेलिकॉम प्रोव्हायडर्ससाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ती १ सप्टेंबरपासून कठोरपणे लागू करण्यास सांगितले आहे. ट्रायने १४० मोबाइल क्रमांक मालिकेद्वारे सुरू होणारे टेलिमार्केटिंग कॉल व कमर्शियल मेसेजिंगना ब्लॉक चेन आधारित डिस्ट्रिब्यूटेड लेझर टेक्नॉलाॅजी (डीएलटी) प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करण्यास सांगितले. यामुळे फसवणुकीचे कॉल बंद होतील, पण डीएलटीवर रजिस्टर्ड टेलिकॉम कंपन्यांचे कॉल-मेसेज थांबणार नाहीत. याचा सामना करण्यासाठी नंबर स्वत: ब्लॉक करावे लागतील.
कंपन्या क्रमांक अनब्लॉक होण्याचा घेताहेत फायदा नैसर्गिक आपत्ती, अंतर्गत किंवा बाह्य सुरक्षा अथवा आवश्यक सुरक्षा निर्देश देण्यासाठी साधारणत: १५-२० दिवसांत काही काळ (दो तास) क्रमांक अनब्लॉक श्रेणीत येतात. यानंतर क्रमांक स्वत:हून ब्लॉक होत नाहीत. याचाच फायदा घेत मार्केटिंग कंपन्या मेसेज आणि कॉल करणे सुरू करतात. ट्रायचे अधिकारी म्हणाले, आपत्कालीन स्थितीचा गैरफायदा घेत मेसेज केल्यावर टेलिमार्केटर कंपन्यांचे सबस्क्रिप्शन एक महिन्यासाठी रद्द होईल. ही चूक पुन्हा केल्यास त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment