सोलापूर: योगगुरू आणि पतंजलीचे बाबा रामदेव यांनी एका योग शिबिरात महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.राज्यभर महिला वर्गातून बाबा रामदेव यांचा तीव्र निषेध केला जात आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा विद्या लोलगे यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. रामदेव यांचे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. बाबा रामदेव यांची बार्बी डॉल करू असा इशाराच त्यांनी दिला आहे. पतंजलीच्या वस्तू वापरू नका असे आवाहन करत त्यांनी सडकून टीका केली आहे. महिलांबद्दल त्यांच्या वक्तव्यामुळं संपूर्ण महिला वर्गाचा अपमान झाला आहे. त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील उपस्थित होत्या,त्या गप्प का बसल्या असा सवाल यावेळी राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी उपस्थित केला आहे.

बाबा रामदेव काय म्हणाले ?

पतंजलीच्या एका कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे.”महिला साडी आणि पंजाबी ड्रेस मध्ये छान दिसतात,पण त्या व्यतिरिक्त देखील छान दिसतात.” असं ते म्हणाले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे ,अमृता फडणवीस यी देखील उपस्थित होते. या वक्तव्याचा राज्यभरात तीव्र शब्दात निषेध केला जात आहे.

आता तर दृश्यम-२ पण आला! आफताबची ‘विजय साळगावकर’ स्टाईल उत्तरं; देहबोलीनं पोलीस हैराण

कुरियरने साडी पाठवणार

बाबा रामदेव यांनी एका स्त्रीच्या पोटातून जन्म घेतला आहे स्त्रियांबद्दल असे विधान करताना त्यांना लाज का वाटली नाही का असं म्हणत राष्ट्रवादीच्या महिलांनी संताप व्यक्त केला. तसेच एका आंदोलनात पोलीस पकडतील म्हणून ते स्त्रीचे कपडे परिधान करून ते पळून गेले होते,ते विसरले का असेही विद्या लोलगे म्हणाल्या.

महिलांनी आता यानंतर पतंजलीच्या वस्तू वापरू नये असे, आवाहन यावेळी त्यांनी केले. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने कुरिअरद्वारे साडीचोळी पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

भाजप नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; जखमी अवस्थेत पक्षातील नेत्यांवरच गंभीर आरोप; CCTV फुटेज समोर

काँग्रेसची टीका

बाबा रामदेव यांनी महिलांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं दिला आहे. त्यांनी महिलांच्या बाबतीत केलेले विधान हे निंदणीय आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेमधे महिलांचा प्रचंड सन्मान झालेला आहे. परंतु. स्वत:ला संत म्हणवून घेणाऱ्या बाबा रामदेवने जाहीरपणे महिलांच्या बाबतीत अश्लील विधान करणे हा महाराष्ट्रातील तमाम महिलांचा अपमान आहे. बाबा रामदेव यांनी तातडीने महिलांची माफी मागून आपले विधान मागे घ्यावे, अन्यथा प्रदेश युवक काँग्रेस तोंडाला काळे फासेल असा इशारा प्रदेश युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोके यांनी दिला आहे.

पराभवानंतर दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात होणार मोठे बदल,कोणाला नारळ मिळणार पाहाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *