मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटातील खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईतील गोरेगाव भागातील नेस्को संकुलात झालेल्या शिवसेना गट प्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधल्यावरुन गवळींवर टीका केली होती. त्यावर बोलताना ‘काल मी त्यांची ताई होते, आज बाई झाले’ असा पलटवार केला आहे.

भावना गवळी काय म्हणाल्या?

काल मी त्यांची ताई होते, आज बाई झाले, रक्षाबंधन सारख्या पवित्र नात्याचं कुणीही राजकारण करु नये. मी मागील अनेक वर्षांपासून माझ्या मतदार संघातील एक लाखापेक्षा जास्त बांधवांना राख्या पाठवते, याआधीही मी अनेक मंत्री, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही राखी बांधली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला संकटकाळी मदत केली म्हणून मी त्यांची साथ दिली, उद्धव साहेब नैराश्यातून अशी विधानं करत आहेत, असं भावना गवळी म्हणाल्या.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणले होते “मला पंतप्रधानांचं आश्चर्य वाटतं, स्वतःच्याच पक्षातील माणसांनी ज्या महिला खासदारावर आरोप केलेत, भ्रष्टाचारी म्हणून आरोप केलेत, तुम्हाला या सव्वा-दीडशे कोटी लोकसंख्येमध्ये हीच बहीण मिळाली राखी बांधायला? भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर निदान खरं खोटं काय ते बघून घ्या, भाजपने काय माणसं धुवायची लॉंड्री काढली आहे काय?” असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला होता.

हेही वाचा : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री, कडाडून विरोध करणाऱ्या फडणवीसांसमोरच देसाई प्रस्ताव मांडणार

फडणवीसांवरही हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस बोलले की त्यांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक, होय, तुमच्या आयुष्यातील ही शेवटचीच निवडणूक आहे. मग तुम्ही विचाराल आपलं काय, तर मी म्हणेन, की आपल्या आयुष्यातील ही पहिलीची निवडणूक आहे असं समजून लढा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ‘ही शेवटची निवडणूक आहे असं समजून लढा’ असं आव्हान फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केलं होतं, त्यावरुनच ठाकरेंनी थेट नाव घेत निशाणा साधला.

हेही वाचा : गटप्रमुखांच्या मेळाव्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा हजारो शिवसैनिकांची गर्दी, ऊर्जा पाहून भास्कर जाधवही भारावलेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.