वाचा: Smartphone Tips: स्मार्टफोन लॉक ते अपडेट्स, अँड्रॉइड फोन यूजर्संनी या ५ गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नये
टोकनायझेशनचे फायदे काय ?
टोकन कार्डने केलेले कोणतेही ऑनलाइन पेमेंट हे फसवणूक करणाऱ्यांपासून युजर्सचे संरक्षण करण्यासाठी निश्चित केले जाते. कारण, कोणत्याही व्यवहारादरम्यान व्यापार्यासोबत Card Details शेअर करताना मूळ कार्ड तपशील टोकनने बदलला जातो. जुलैपासून, ऑनलाइन पेमेंट टोकन प्रत्येक कार्ड, टोकन युजर आणि व्यापारी यांच्यासाठी युनिक असेल. यापूर्वी, कोणतेही ऑनलाइन पेमेंट करताना, क्रेडिट किंवा डेबिट कार्डधारक त्यांचे कार्ड डिटेल्स व्यापारी साइटवर सेव्ह करायचे. कारण, त्यामुळे पेमेंट करणे सोयीचे होते.
पण, कार्ड तपशील ऑनलाइन सेव्ह केल्यामुळे, फसवणूक करणारे डिटेल्स चोरतात. अशा ऑनलाइन पेमेंट घोटाळ्यांचा सामना करण्यासाठी, RBI ने टोकन प्रणाली लागू केली. कार्ड टोकनायझेशन आवश्यक नाही. टोकन प्रणालीची निवड न केल्यास, जून अखेरपर्यंत ऑनलाइन पेमेंट पूर्ण करण्यासाठी users ना प्रत्येक वेळी सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील. कार्ड टोकनीकरण विनामूल्य आहे.
वाचा: YouTube वर असं काय केलंय?, कोट्यवधी कमावतोय १५ वर्षीय मुलगा, घराबाहेर लग्झरी गाड्यांची रांग
टोकनाइज्ड कार्ड कसे मिळवायचे?
तुम्ही बँकेच्या वेबसाइटवर किंवा अॅपवर टोकन रिक्वेस्टरद्वारे रिक्वेस्टर करून कार्ड टोकन मिळवू शकता. टोकन रिक्वेस्टर केल्यावर, व्यापारी थेट क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँकेला विनंती पाठवेल (व्हिसा / मास्टरकार्ड / डिनर/ रुपे). टोकन रिक्वेस्टरकडून टोकन रिक्वेस्टर प्राप्त करणारी पार्टी एक टोकन तयार करेल. जे टोकन रिक्वेस्टर आणि मर्चेंटची संबंधित असेल.
वाचा: Father’s Day 2022: वडिलांसोबत शेयर करा व्हॉट्सअॅप अकाउंट सुरक्षितपणे वापरण्याच्या ‘या’ टिप्स