टोल नाक्यावरील महिला कामगारांना अश्लिल शिवीगाळ:दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
टोल नाक्यावर दारु पिऊन कामावर येणार्यांना मज्जाव करणार्या सुपरवायझर महिलेसह कामावरील महिलांना अश्लिल शिवीगाळ केली. तसेच कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी सर्जेराव मोहन चव्हाण याच्या विरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. करोडी टोल नाक्यावर सय्यद आसिफा हमीद अली (40, रा. माळीवाडा) ही महिला सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. टोल नाक्यावर जवळपास दहा महिला कार्यरत आहेत. याच टोल नाक्यावर काम करणारे काही मुलं हे दारू पिऊन कामावर येतात. टोल नाक्यावर महिला असल्याने सुपरपायझर सय्यद आसिफा अली यांनी मुलांना कामावर येताना दारू पिऊन येऊ नका असे समजावून सांगितले. मात्र, या मुलांनी परिसरातील करोडी येथील सर्जेराव मोहन चव्हाण (48) यास सुपर वायझर महिलेची तक्रार केली. त्यामुळे सर्जेराव चव्हाण काही साथीदारांना घेऊन बुधवारी सायंकाळी 4 वाजता करोडी टोल नाक्यावर येऊन उपस्थिती कामावरील सर्व महिला कामगारांना शिवीगाळ केली. महिलांना शिवीगाळ दमदाटी करण्यावरून सय्यद असीफा हमीद अली यांनी जाब विचारला. त्यावर सर्जेराव चव्हाण याने थेट अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. तसेच तुम्हाला कामावरून काढून टाकीन अशी धमकी दिली. या अश्लील शिवीगाळ प्रकरणी सय्यद आसिफा यांनी दिलेल्या तक्रारीवरून सर्जेराव मोहन चव्हाण याच्या विरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत. उल्कानगरीत तोतया पोलिसांनी वृद्धाला लुबाडले पोलिस असल्याची बतावणी करून दोघांनी वृद्धाच्या हातातील दोन अंगठ्या घेऊन धूम ठोकली. ही घटना 3 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उल्कानगरी भागात घडली. फिर्यादी सतीश हरिनारायण मालपाणी (73, रा. ऑगस्ट होम, उल्कानगरी) हे सकाळी देवदर्शनासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे निघाले होते. रस्त्यात त्यांना दुचाकीवर आलेल्या दोघांनी थांबविले. त्यांना मी पोलिस ऑफिसर आहे अशी बतावणी करून ओळखपत्र दाखविले. त्यानंतर लुटमारीच्या घटना वाढल्या असून तुमच्याकडील अंगठ्या काढून खिशात ठेवा असे म्हणून हातचलाखीने दोन्ही अंगठ्या लंपास करून पसार झाले. याप्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.