Best 5000 mAh Battery Smartphones: स्मार्टफोन युजर्स आता पूर्वीपेक्षा अधिक सजग झाले आहेत. नवीन फोन खरेदी करतांना ते प्रत्येक फीचर आवर्जून चेक करतात. काहींना चांगला कॅमेरा हवा असतो. तर, काही लोक मोठी बॅटरी ऑफर करणारा फोन खरेदी करणे पसंत करतात. तर, काही युजर्स फोनमध्ये किती स्टोरेज मिळेल याकडे लक्ष देतात. जर तुम्हीही अशाच युजर्स पैकी एक असाल आणि मोठी बॅटरी आणि कमीत कमी १२८ GB स्टोरेज असलेला स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही चांगले पर्याय आणले आहेत, जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. येथे आम्ही तुम्हाला ५००० mAh बॅटरी आणि १२८ GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनबद्दल माहिती देत आहोत. ज्याची सुरुवातीची किंमत १०,००० पेक्षाही कमी आहे. चला जाणून घेऊया या फोन्सबद्दल सविस्तर.

Tecno Spark 9

tecno-spark-9

Tecno Spark 9 : या फोनची डिझाईन चांगली असून यात उत्तम फीचर्स आहेत. या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत ९७९९ रुपये आहे. या फोनमध्ये तुम्हाला ६.६ -इंचाचा HD+ डिस्प्ले मिळेल, जो ९० Hz रिफ्रेश रेटने सुसज्ज आहे. फोटो आणि व्हिडिओसाठी या फोनमध्ये १३ MP ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे. परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये Helio G37 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे. बजेट बायरसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

वाचा : Smartphone Tips: मित्रांना फोन देतांना ऑन करा ‘ ही’ सेटिंग, स्मार्टफोनमधील महत्वाची माहिती पाहुच शकणार नाही

Poco M4 5G

poco-m4-5g

Poco M4 5G: हा एक अतिशय लोकप्रिय स्मार्टफोन आहे. जो अनेक चांगल्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. Poco M4 5G ची किंमत १२,९९९ रुपये आहे. Poco M4 5G 90Hz रिफ्रेश रेट आणि २४० Hz टच सॅम्पलिंग रेटसह ६.५८ -इंचाचा LCD डिस्प्ले पॅक करतो. फोटो आणि व्हिडिओंसाठी, या फोनमध्ये ५० MP प्रायमरी सेन्सर आणि २ MP डेप्थ सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्य ८ MP फ्रंट कॅमेरा आहे. कामगिरीसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 चिपसेट आहे आणि पॉवरसाठी, या फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे.

वाचा : Smartphone Offers : Samsung च्या ‘या’ लेटेस्ट स्मार्टफोनवर पहिल्यांदाच इतका मोठा ऑफ, ऑफर चुकवू नका

Relame Smartphone

relame-smartphone

Realme C11 2021: २०२१ मध्ये लाँच करण्यात आलेल्या Realme C11 2021 स्मार्टफोनमध्ये तुम्ही ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि ५००० mAh ची बॅटरी सारखे खास फीचर्स मिळतील. Realme C11 ची किंमत ९६९० रुपये आहे. हा Realme मोबाइल फोन Android 11 वर आधारित Realme UI २.० वर चालतो. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, या हँडसेटमध्ये तुम्हाला ६.५ -इंचाचा HD+ डिस्प्ले मिळेल,या बजेट स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. फोनमध्ये वाय-फाय, 4G एलटीई, जीपीएस-ए-जीपीएस, ब्लूटूथ, ३.५ मिमी हेडफोन जॅक आणि मायक्रो-यूएसबी पोर्ट सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

वाचा: 5G Deal: चीनी कंपन्यांचे हात रिकामेच, Nokia, Samsung आणि Ericsson ने मारली बाजी, पाहा डिटेल्स

Redmi 9 Activ

redmi-9-activ

Redmi 9 Activ : Redmi 9 Activ मध्ये ६.५३ -इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. परफॉर्मन्ससाठी हा फोन MediaTek Helio G35 प्रोसेसरवर चालतो. यामध्ये, ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये १३ एमपी प्रायमरी सेन्सर आणि २ एमपी डेप्थ सेन्सर समाविष्ट आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी ५ MP कॅमेरा आहे. या फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे. जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनच्या Redmi 9 Active च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत १०,९९९ रुपये आहे.

वाचा : Validity Plans : वारंवार रिचार्जचे टेन्शन विसरा ! ‘हे’ स्वस्त प्लान्स देतात १ वर्षापर्यंतची व्हॅलिडिटी, हाय स्पीड डेटासह ‘हे’ फायदे

Samsung Galaxy M13 5G

samsung-galaxy-m13-5g

Samsung Galaxy M13 5G: सॅमसंगचा हा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. यात ९० Hz रिफ्रेश रेटसह ६.५ -इंचाचा फुल HD+ IPS LCD डिस्प्ले आहे. फोटो आणि व्हिडिओसाठी या फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये Mediatek Dimensity 700 5G SoC प्रोसेसर आहे, तर पॉवरसाठी, हा फोन ५००० mAh बॅटरीसह सुसज्ज आहे, जो १५ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सुसज्ज आहे. या फोनमध्ये रॅम प्लस सपोर्ट देखील देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने रॅम १२ GB पर्यंत वाढवता येते. Galaxy M13 5G आणि 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे.

वाचा : युजर्सचा फेव्हरेट आहे Jio चा ‘हा’ प्लान, ७०० GB पर्यंत डेटासह फ्री Netflix, Prime Video आणि हॉटस्टार मिळणारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.