तोयबाचा अतिरेकी रवांडातून अटकेत:बंगळुरूतील दहशतवादी कारवायांत हात, एनआयएच्या पथकाने भारतात आणले

लष्कर-ए-तोयबाच्या फरार अतिरेकी सलमान रहमान खानच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. सीबीआय व इंटरपोलच्या मदतीने एनआयएने त्याला रवांडातून प्रत्यर्पणाद्वारे मायदेशी आणले आहे. आता त्याच्या साह्याने दक्षिण भारतातील दहशतवादी कारवायांचे जाळे उजेडात येऊ शकते. सलमानने बंगळुरूत दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी शस्त्रास्त्रे, दारूगोळा, स्फोटके पुरवण्यास मदत केली होती. २०२३ मध्ये बंगळुरूत दहशतवाद पसरवण्याचा कट प्रकरणात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. पॉक्सो प्रकरणात शिक्षेदरम्यान केले होते ब्रेनवॉश सलमान पॉक्सो प्रकरणात शिक्षा भोगताना दहशतवादी प्रकरणातील जन्मठेप झालेला दहशतवादी टी. नसीरच्या संपर्कात आला होता. तेथे नसीरने त्याचे ब्रेनवॉश केले. त्याच्या दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड झाल्यानंतर नसीरनेच त्याला तुरुंगातून कोर्टात नेले जाताना पळून जाण्यास मदत केली होती. त्यानंतर सलमान रवांडाला पळून गेला होता.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment