दरम्यान, IPO लाँच करण्यापूर्वी कंपनीने राइट्स इश्यू करून ६२.०१ कोटी रुपये उभे करत या कालावधीत कंपनीच्या प्रवर्तक THCL ला २,६२,७,६९७ इक्विटी शेअर्स जारी करण्यात आले होते. त्याचवेळी, कंपनीच्या शेअर्सचे वाटप २५ सप्टेंबर रोजी फायनल केले जाऊ शकते. तर कंपनीचे शेअर्स २९ सप्टेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. याशिवाय देशातील तिसरी सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीने गुरूवार, १४ सप्टेंबर रोजी, प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) उघडण्याच्या एक दिवस आधी अँकर गुंतवणूकदारांकडून ३४८.७५ कोटी रुपये उभारले आहेत. कंपनीने एकूण ३३ अँकर गुंतवणूकदारांकडून ही रक्कम उभी केली आहे.
यात्रा ऑनलाईन IPO लॉटचा आकार
यात्रा ऑनलाइनच्या या IPO मध्ये तुम्हाला किमान १०५ शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. म्हणजे एका लॉटसाठी तुम्हाला किमान १४ हजार ९१० रुपये गुंतवावे लागतील. कंपनीने IPO मध्ये ६०२ कोटी रुपयांचे नवीन इक्विटी जारी केले असून कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत १.२१८ कोटी शेअर्सची विक्री करतील. तर अप्पर प्राइस बँडनुसार या इश्यूचा आकार ७७५ कोटी रुपये आहे.
यात्रा ऑनलाईन IPO जीएमपी काय
असूचीबद्ध बाजारपेठेतील (ग्रे मार्केट) यात्रा ऑनलाइन शेअरचा जीएमपी ० रुपये आहे. म्हणजेच हा शेअर १४२ रुपयांच्या इश्यू किमतीवर प्रिमियम किंवा डिस्काउंटसह ट्रेंड करत आहे. कंपनी IPO मधून उभारलेल्या निधीचा वापर धोरणात्मक गुंतवणूक, अधिग्रहण, तंत्रज्ञान ऑप्टिमायझेशन आणि वाढीच्या योजनांवर करेल.
(Disclaimer: इथे दिलेला तपशील माहितीसाठी आहे आणि गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत तज्ञांशी चर्चा करा.)