म. टा. प्रतिनिधी, संभाजीनगर: दिवाळीच्या चैतन्यमय वातावरणात सर्वांच्या आयुष्यात आनंद मिळणे आवश्यक असते. विकासाच्या प्रवाहात सर्वांना सामावून घेण्यासाठी हरेक प्रयत्न केले जातात. योजना राबविल्या जातात पण अजूनही अनेकजण या आनंदापासून दूर आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकावा, घरावर आकाशदिवा लागावा यासाठी विविध संस्था, संघटना दरवर्षी कार्यरत असतात. यंदाही शहरातील विविध वसाहतींमध्ये विविध संस्था, संघटना, दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराने दिवाळी उत्सव साजरा केला जात आहे.
रोटरी क्लब ऑफ मेट्रो औरंगाबाद आणि आस्था जनविकास संस्था यांच्या वतीने ८० कुटुंबांना शनिवारी अनोखी दिवाळी भेट देण्यात आली.

माळीवाडा परिसरात आदिवासी गोंड कुटुंबातील कुटुंबे झोपडीत राहतात. आयुर्वेदिक औषधी, सुकामेवा दारोदार फिरुन हे लोक विकतात. दोन संस्थांच्या पुढाकाराने त्यांच्या झोपडीत आकाश कंदील लावण्यात आले. तोरण सजले. उटण, रंगबेरंगी रांगोळ्यांचे रंग, गृहिणीला साडी, चिवडा, चकली, शंकरपाळे, शेव, लाडूचा फराळ देण्यात आला. लहान मुलांसाठी किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि किल्ल्यांची शोभा वाढणारे मावळे भेट म्हणून देण्यात आले, किल्ला पाहताना तर चिमुकले हरवून गेले.

लातूर जिल्ह्यात मराठेतर जातीतही कुणबी नोंदी, त्यांनाही ओबीसी आरक्षण मिळणार का? अभ्यासक म्हणाले…
छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देत त्यांनी आनंद साजरा केला. बीडबायपास रोडवरील मातीकाम करणाऱ्या काही कुटुंबानाही भेटवस्तू देण्यात आल्या. यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी खूप सुखावणारी ठरली. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ मेट्रो औरंगाबादच्या अध्यक्षा आरती पाटणकर- अय्यंगार, आस्था जनविकास संस्थेच्या अध्यक्ष डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी पुढाकार घेतला. डॉ. प्रिया शेंडे, चंद्रकांत चौधरी, मिलिंद देशपांडे, मुकुंद कुलकर्णी ,सुमेधा देशपांडे, ईशा देशपांडे, रोहित कुलकर्णी, डॉ.प्राजक्ता वाघ, मंजुषा माळवतकर ,दीपक लोणकर यांची उपस्थिती होती. उपक्रमासाठी अनेकांनी सहकार्य केले. विद्यादीप बालगृहात कपडे, मिठाई वाटप करण्यात आले.

दिवाळी केली साजरी अनोख्या पद्धतीने

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होली हेल्पिंग हॅन्ड चारिटेबल ट्रस्ट यांनी अनोख्या पद्धतीने दिवाळी उत्सव साजरा केला. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ५१ किराणा किटचे वाटप केले. गरीबांसाठी लाडवाचा एक घास असावा म्हणून प्रत्येकी ३०१ रुपये जमा करून आणि त्या जमलेल्या पैशांमधून ५१ किराणा किट तयार केल्या (गहू, साखर, चना डाळ, पोहे, तांदूळ) व गरजवंतांच्या वसाहतींमध्ये वाटप केल्या. अमरीश गुजराती, सचिन मलिक, दादासाहेब भंडे, अनिल चव्हाण, हरिवंश देशमुख, रमेश निकुंभ, असलम खान, रामकिशन खर्डेकर व मयूर भावसार यांनी पुढाकार घेतला, असे संस्थेचे अध्यक्ष अनिल जठार यांनी सांगितले.

दिवाळीच्या फटाक्यांमध्येही क्रिकेट वर्ल्डकप फिव्हर! बाजारात बॅट आणि बॉलचे फटाके

Read Latest Maharashtra News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *