या हल्ल्यात त्या व्यक्तीचा चेहरा आणि छातीचा चुराडा झाला होता. रोबोटमध्ये तांत्रिक बिघाड होता आणि त्याने व्यक्तीला सिमला मिरचीने भरलेला बॉक्स समजलं. घटनेवेळी हा माणूस रोबोटची तांत्रिक चाचणी करत होता.
Daionhap वृत्तसंस्थेने बुधवारी सांगितलं की, दक्षिण कोरियामध्ये एका माणसाला रोबोटने चिरडून ठार केले आहे. या रोबोटने माणसाला भाज्यांनी भरलेला बॉक्स समजला. मृत व्यक्तीचे ओळख ४० वर्षीय रोबोटिक्स कंपनीचा कर्मचारी अशी सांगण्यात आली आहे. ही व्यक्ती दक्षिण ग्योंगसांग प्रांतातील कृषी उत्पादन वितरण केंद्रात रोबोटचे सेन्सर तपासत होती.
रोबोटने बॉक्स आणि मानव यांच्यातील फरक समजून घेण्यात चूक केली आणि त्या व्यक्तीलाच बॉक्स समजले. कोणत्याही आदेशाशिवाय त्याने व्यक्तीचा वरचा भाग खालच्या भागापासून वेगळा करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्या व्यक्तीच्या चेहऱ्याला आणि छातीला जबर दुखापत झाली होती.
योनहॅपने पोलिसांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, रोबोट सिमला मिरचीने भरलेला बॉक्स उचलत होता. यादरम्यान, काहीतरी तांत्रिक गडबड झाली आणि त्याने समोर उभ्या असलेल्या माणसाला डबा समजलं. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात हलवण्यात आले. पण, नंतर त्याचा मृत्यू झाला, असं सांगण्यात आले.
Read Latest Maharashtra News And Marathi News