मुंबई : बिग बॉस मराठीचं चौथं पर्व अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर आलं आहे. घरातील आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी घरातील प्रत्येक सदस्य प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहे. टास्क खेळताना ही कशाचीही पर्वा न करता जीवाच्या आकांतानं ते खेळत आहेत. नॉमिनेनशमध्ये आपलं नाव येऊ नये यासाठी चांगला खेळ खेळण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहेत. घऱातील स्पर्धकांमध्ये तेजस्विनी लोणारे हिचा खेळ अनेक प्रेक्षकांना आवडत आहे. खुद्द महेश मांजरेकर यांनी देखील बिग बॉसच्या चावडीवर अनेकदा तसं बोलूनही दाखवलं आहे. तेजस्विनीच्या खेळाचं कौतुक बॉलिवूडचा बाजीराव अर्थात रणवीर सिंग यानं देखील केलं आहे. रणवीरनं तेजस्विनीला उद्देशून शेअर केलेल्या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात घरामध्ये तेजस्विनी लोणारे, अपूर्वा नेमळेकर, रोहित शिंदे, प्रसाद जवादे, विकास सावंत, किरण माने, अक्षय केळकर, अमृता धोंडगे, अमृता देशमुख,स्नेहलता वसईकर हे सदस्य आहेत. या सर्वांनी बिग बॉसच्या घरात ५० दिवस पूर्ण केले आहेत. ५० दिवसांचा हा टप्पा सर्व स्पर्धकांसाठी महत्त्वाचा होता. ५० दिवस घरात राहणाऱ्या तेजस्विनी लोणारे हिच्यासाठी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंग यानं शुभेच्छा दिल्या आहेत. तेजस्विनीला शुभेच्छा देणार रणवीरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे. चक्क रणवीरनं तेजस्विनीला शुभेच्छा दिल्याचं पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.


घरामध्ये ज्या पद्धतीने तेजस्विनी खेळत आहे, ते पाहून अनेकांनी ती जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तिला घरात ५० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्यानं एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात रणवीर म्हणाला आहे की, ‘हाय तेजू. अभिनंदन तेजू. बिग बॉसच्या घरात तू ५० दिवस पूर्ण केले आहेस. तू खूप छान खेळत आहेस. महेश सरांना माझा सलाम. तेजू मी तुला खूप मिस करत आहे. तुझ्या उर्वरित प्रवासासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तू जिंकून ये मग आपण सेलिब्रेट करू या. तुला खूप खूप खूप प्रेम आणि खूप साऱ्या शुभेच्छा…’

तेजस्विनी लोणारीची पहिल्या दिवसापासून खेळी वेगळीच आहे. प्रत्येक टास्क ती पूर्ण ताकदीने खेळतेच शिवाय घरात प्रत्येकाला ती चांगल्या मैत्रीच्या नात्याने समजुन घेते. नुकताच झालेला राणी मुंगीचा टास्क पण तेजस्विनीने उत्तम रीतीने खेळला. तिच्या खेळाचे सर्वांनी प्रचंड कौतुक केले. यासाठी संचालक किरण मानेने तिला पहिल्या नंबरच मेडल देखील दिलं. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये तेजस्विनी लोणारी ही पहिल्या पासून घरातील उत्तम स्पर्धक म्हणून खेळत आहे. घरातून बाहेर पडलेल्या सगळ्याच स्पर्धकांनी घरातील लंबी रेस का घोडा म्हणून तेजूचं नाव घेतलं आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *