मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख यांनी मुंबईतील शिवसेनेच्या गट प्रमुखांच्या मेळाव्यात ढीगभर गद्दार सोबत असण्यापेक्षा मुठभर निष्ठावान असले पाहिजेत. देवेंद्र फडणवीसांच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक आहे. आपल्या आयुष्यातील पहिली निवडणूक असल्यासारखी लढा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं. आपल्याकडे काही नाही असं समजा, ही पहिली निवडणूक आहे असं समजा. मुंबई महापालिका बरखास्त झाली आहे. आमदार गेले, खासदार गेले ती जागा पडलेली आहे असं समजा आणि तिथं भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

२०१२ साली आपण करुन दाखवलं या दोन शब्दांवर जिंकलो होतो. २०१७ हे माहिती आहे का हे सांगितलं. आम्ही जे बोलतो ते करुन दाखवतो. पुढच्या आठवड्यात पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. मुंबई महापालिकेवर कब्जा मिळवण्यासाठी पंतप्रधान येत आहेत, गृहमंत्री आहेत, आपले गद्दार आहेत, मुन्नाभाई आहे पण आपण त्याच लढाईची वाट पाहतोय.

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, संजय राऊत तुरुंगात, पण उद्धव ठाकरेंच्या सभेत खुर्ची मात्र राखीव!

आपल्याला जमीन दाखवणाऱ्यांना अस्मान दाखवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे का? शिवसैनिकांच्या पाठबळावर अमित शाहांना आव्हान देतो, तुम्ही हिंदू मुस्लीम करुन बघा, मुस्लीम समाज आमच्यासोबत आहे. मराठी अमराठी करुन बघा, अमराठी आमच्यासोबत आहेत. कारण करोना काळात मी सर्वांचे प्राण वाचवले आहेत. १९९२ -९३ च्या दंगलीवेळी शिवसैनिकांनी दर्ग्याचं संरक्षण केलं होतं.

तोडा फोडा आणि राज्य करा ही शाह निती यशस्वी होणार नाही. म्हणून अमित शाहांना आव्हान देतो, तुमच्या चेल्या चपाट्यांना सांगा हिंम्मत असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक एका महिन्यात घेऊन दाखवा, त्यानंतर विधानसभेची निवडणूक घ्या, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.

जमीन दाखवा म्हणणाऱ्या शाहांना अस्मान दाखवा, उद्धव ठाकरेंची डरकाळी

सुरतला आमदार जात असताना ३० ते ४० आमदार सोबत होते. विकलेली माणसं किती काळ सोबत राहणार, मी त्यांना दार उघडं आहे निघून जा असं सांगितलं. बुडबुडे जास्त काळ टिकत नाहीत. मोठे झालेले फुटले पण मोठे करणारे माझ्यासोबत बसलेले आहेत. आयुष्यात आपल्याला मिळालेली ही सुवर्णसंधी आहे. मी उभा केलेला शिवसैनिक मर्द आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केलं.

मिंधे गट, गिधाडं, कमळाबाई, २५ वर्ष युतीत सडल्याचा पुनरुच्चार, उद्धव ठाकरेंचा चौफेर हल्लाबोलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.