शिकार करण्यासाठी दोन पावले मागे यावे लागते:भाजपच्या संजयकाका पाटलांनी विधानसभेसाठी थोपटले दंड

शिकार करण्यासाठी दोन पावले मागे यावे लागते:भाजपच्या संजयकाका पाटलांनी विधानसभेसाठी थोपटले दंड

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे आयोजित प्रभोदय दहीहंडीच्या आयोजित कार्यक्रमात माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू असल्याचे सूचित केले आहे. सांगली लोकसभेच्या पराभवानंतर संजयकाका पाटील यांनी आगामी विधानसभेसाठी दंड थोपटले असल्याचे दिसत आहे. संजयकाका म्हणाले, शिकार करायची असेल तर दोन पावले मागे यावे लागते. संजयकाका म्हणाले, सांगली लोकसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्यापेक्षा जातीपातीच्या राजकारणामुळे माझी अडचण निर्माण झाली, पण या पराभवाने खचून जाणारा संजय पाटील नाही. दोन महिन्यावर असलेल्या विधानसभा निवडणुकीत ताकदीने काम करून आपणाला विधानसभा जिंकायची आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. संजयकाका पाटील यांनी तासगाव विधानसभा लढवण्याचे सांगितले असले तरी ते स्वतः निवडणूक लढवणार की मुलगा प्रभाकरला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. दरम्यान, तासगाव मतदारसंघातून आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्यासारखे आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना संजयकाका पाटील म्हणाले, काहींना केवळ मोठे बोलण्याची सवय आहे. हातभर लाकूड आणि दहा हात ढांपी असं सुरू आहे, असे म्हणत त्यांनी आर. आर. पाटील यांच्या कुटुंबियांवर टीका केली आहे. ते पुढे म्हणाले, आपण जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची कामे केली. पाणी, रस्ता, रेल्वेचे प्रश्न सोडवले. अनेक रखडलेल्या योजना पूर्णत्वास नेल्या. लोकांनी आशीर्वाद दिले म्हणून हे सर्व करता आले. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा ताकतीने आपणास विधानसभा निवडणूक लढायची आहे. त्यामुळे दोन महिने ताकदीने काम करूया. तालुक्यात विकासाचे पर्व पुन्हा नव्या पिढीच्या हातात देऊया. गतिमान विकास करूया, प्रभाकर पाटील तुमच्यासाठी काम करत आहे, असे संजयकाका पाटील यांनी म्हणले आहे. यावरून संजयकाका पाटील यांच्या या विधानामुळे त्यांचे चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

​सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे आयोजित प्रभोदय दहीहंडीच्या आयोजित कार्यक्रमात माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू असल्याचे सूचित केले आहे. सांगली लोकसभेच्या पराभवानंतर संजयकाका पाटील यांनी आगामी विधानसभेसाठी दंड थोपटले असल्याचे दिसत आहे. संजयकाका म्हणाले, शिकार करायची असेल तर दोन पावले मागे यावे लागते. संजयकाका म्हणाले, सांगली लोकसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्यापेक्षा जातीपातीच्या राजकारणामुळे माझी अडचण निर्माण झाली, पण या पराभवाने खचून जाणारा संजय पाटील नाही. दोन महिन्यावर असलेल्या विधानसभा निवडणुकीत ताकदीने काम करून आपणाला विधानसभा जिंकायची आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. संजयकाका पाटील यांनी तासगाव विधानसभा लढवण्याचे सांगितले असले तरी ते स्वतः निवडणूक लढवणार की मुलगा प्रभाकरला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. दरम्यान, तासगाव मतदारसंघातून आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्यासारखे आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना संजयकाका पाटील म्हणाले, काहींना केवळ मोठे बोलण्याची सवय आहे. हातभर लाकूड आणि दहा हात ढांपी असं सुरू आहे, असे म्हणत त्यांनी आर. आर. पाटील यांच्या कुटुंबियांवर टीका केली आहे. ते पुढे म्हणाले, आपण जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची कामे केली. पाणी, रस्ता, रेल्वेचे प्रश्न सोडवले. अनेक रखडलेल्या योजना पूर्णत्वास नेल्या. लोकांनी आशीर्वाद दिले म्हणून हे सर्व करता आले. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा ताकतीने आपणास विधानसभा निवडणूक लढायची आहे. त्यामुळे दोन महिने ताकदीने काम करूया. तालुक्यात विकासाचे पर्व पुन्हा नव्या पिढीच्या हातात देऊया. गतिमान विकास करूया, प्रभाकर पाटील तुमच्यासाठी काम करत आहे, असे संजयकाका पाटील यांनी म्हणले आहे. यावरून संजयकाका पाटील यांच्या या विधानामुळे त्यांचे चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment