पुणे : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात राषट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतीचे गतकाळातील काही जुने फोटो दाखवण्यात आले होते. हे फोटो पाहून सुप्रिया ताईंना अश्रू अनावर झाले आहेत. हाच प्रश्न आज अजित पवार यांना विचारण्यात आला. मात्र दादांनी कोणतंच उत्तर न देता हात जोडत तिथून काढता पाय घेतला.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कंत्राटी भरती, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, संभाजीनगरची मंत्रिमंडळ बैठक अशा विषयांवरून प्रश्न विचारण्यात आले. यानंतर पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलचा प्रश्न विचारला. मात्र त्यांनी त्यावर मौन बाळगणं पसंत केलं. इतर सगळ्या प्रश्नांवर दादांनी मनमोकळेपणाने उत्तरं दिली. मात्र सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ‘चला नमस्कार’ म्हणत पत्रकार परिषद आटोपती घेऊन तिथून काढता पाय घेतला.

सुप्रिया सुळेंनी मागितली यशवंतराव चव्हाणांची माफी

सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यात अश्रू

‘नातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे’ हे पवार कुटुंबीय अनेकदा सांगत आलेत. सुप्रिया सुळेंनी जेव्हा अजित पवार हे आजही आमचे नेते आहेत, असं सांगितलं होतं. तेव्हा त्यावर स्पष्टीकरण देताना शरद पवारांनी बहीण-भावाच्या नात्याचा दाखला देत सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सारवासारव केली. दादा-ताईंमधील याच नात्यातील हळवेपणाची साक्ष देणारे क्षण ‘खुपते तिथे गुप्ते’ या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात पाहायला मिळाले.

सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे गतकाळातील एकत्रित आनंदाच्या क्षणांचे फोटो ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात दाखवण्यात आले. त्याच वेळी सुप्रियाताई अजितदादांचं औक्षण करतानाचा व्हिडिओ लागला आणि सुप्रिया सुळेंच्या अश्रूंचा बांध फुटला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर यंदाचं रक्षाबंधन सुप्रिया सुळे यांनी अजितदादांसोबत साजरं केलेलं नाही. कदाचित हेच आठवून सुप्रिया सुळे यांच्या आठवणी दाटून आल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले.

अजित दादांचे फोटो पाहून सुप्रिया सुळेंना अश्रू अनावर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *