उद्धटपंत, अजून तरी शहाणे व्हा:भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला; हिंदुत्व सोडून ‘असंगाशी संग अंगलट’ आला असल्याचा दावा
उद्धव ठाकरे यांनी अजून तरी शहाणे व्हावे. असंगाशी संघ त्यांच्या अंगलट आले असल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. हिंदुत्व सोडून त्यांनी संजय राऊत यांच्या नादी लागणे, त्यांना केवढ्याला पडले, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. या माध्यमातून चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. या संदर्भात चित्रा वाघ यांनी एका पोस्टच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जाऊन चूक केली असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून असंगाशी संग केला असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. या संदर्भात चित्रा वाघ यांनी एका पोस्टच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘सर्वज्ञानी रडतरौतांची बौद्धिक कुवत किती आहे ? हे उद्घटपंत सोडून सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्यामुळे पक्ष सोडून अनेक जण गेले, तरी उद्धटपंत त्यांना कवटाळून बसले आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. उद्धटपंत, अजून तरी शहाणे व्हा. ‘असंगाशी संग’ अंगलट आला आहे. वंदनीय बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व सोडून या रडतरौताच्या नादी लागणं केवढ्याला पडलं बघा ?’ राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. तर आता निकालात महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवत आघाडीवर मात केली आहे. बहुमतापेक्षा अधिकच्या जागा जिंकत राज्यात एक हाती सत्ता मिळवण्यात महायुतीला यश आले आहे. एकट्या भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे वादळ महाराष्ट्रात पाहायला मिळाले. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.