उद्धव ठाकरे गटाचे 22 शिलेदार ठरले:मुंबईतील संभाव्य उमेदवारांची यादी समोर, नव्या जुन्यांचा मेळ; आदित्य ठाकरे वरळीतूनच लढणार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईतील आपले 22 उमेदवार निश्चित केलेत. यासंबंधीची एक यादी समोर आली असून, ती जवळपास अंतिम असल्याचे सांगितले जात आहे. या यादीनुसार, आदित्य ठाकरे हे आपल्या वरळी विधानसभा मतदारसंघातूनच आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराशी दोनहात करतील. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी दीपावलीनंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्वच पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपला बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई विभागावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार, या पक्षाने मुंबईतील 36 पैकी 20 ते 22 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. या जागांवरील संभाव्य उमेदवारांची एक यादी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गट या उमेदवारांनाच उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी याविषयी बोलताना ही यादी अंतिम नव्हे तर संभाव्य असल्याचे स्पष्ट केले आहे. सदर यादी अंतिम नव्हे तर संभाव्य आहे. या यादीद्वारे शिवसेना विद्यमान आमदारांसह तरुणांनाही संधी देत असल्याचे स्पष्ट होत आहे. तरुणांना संधी दिलीच पाहिजे. पण त्यात जुने-जाणते लोक असणेही तेवढेच गरजेचे आहे. या प्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन संयुक्त शिवसेनेने मुंबईतील 14 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर यंदा झालेल्या लोकसबा निवडणुकीत ठाकरे गटाने येथील 3 जागा जिंकल्या होत्या, तर चौथ्या जागेवर त्यांचा निसटता पराभव झाला होता. खाली वाचा संभाव्य उमेदवारांची यादी वरळी – आदित्य ठाकरे
दहिसर – तेजस्विनी घोसाळकर
वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
दिंडोशी – सुनील प्रभू
विक्रोळी – सुनील राऊत
अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
कलिना – संजय पोतनीस
कुर्ला – प्रविणा मोरजकर
वडाळा – श्रद्धा जाधव
चेंबूर – अनिल पाटणकर/ प्रकाश फार्तेपेकर
अणुशक्तीनगर – विठ्ठल लोकरे / प्रमोद शिंदे
घाटकोपर – सुरेश पाटील
मागाठाणे – विलास पोतनीस / सुदेश पाटेकर/ संजना घाडी जोगेश्वरी – अमोल कीर्तिकर
चारकोप – नीरव बारोट
गोरेगाव – समीर देसाई
भांडूप – रमेश कोरगांवकर
चांदिवली – ईश्वर तायडे
दादर-माहिम – सचिन अहिर, विशाखा राऊत
वर्सोवा – राजू पेडणेकर/ राजूल पटेल
शिवडी – अजय चौधरी/ सुधीर सालवी
भायखळा – किशोरी पेडणेकर/ जामसुतकर/ रहाटे