मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर मराठी भूमिपुत्रांचा मुद्दा घेऊन शिवसेनेची स्थापना झाली. पहिला दसरा मेळावा १९६६ मध्ये दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या दसरा मेळाव्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा दसरा मेळाव्यापूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा होतेय. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंड करत आपणच शिवसेना असल्याचा केलेला दावा यामुळं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाणाची लढाई केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला महत्त्व प्राप्त झालंय.

उद्धव ठाकरेंसाठी दसरा मेळावा का महत्त्वाचा?

शिंदे गटाच्या नेत्यांनी आम्हीच शिवसेना असल्याचं सांगत पक्षावरच दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं सध्या विधानसभेचे १५ आमदार, विधानपरिषदेतील आमदार, राज्यसभेचे खासदार आणि लोकसभेचे ६ खासदार आहेत. एका बाजूला कोर्टातील लढाई पुढच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात होणार आहे. सुप्रीम कोर्टातील कायदेशीर लढाई सुरु असतानाचं शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा असणारा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मेळावा घेत उद्धव ठाकरेंना शिवसेना आपलीच असल्याचं दाखवून देण्याची संधी आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत शिवसैनिक आणि महाराष्ट्रापुढं शिवसेना पक्ष आपल्यासोबत असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडे असेल.

दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत आतापर्यंत काय घडलं?

शिवाजी पार्कवरील पहिला दसरा मेळावा १९६६ मध्ये झाला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यानंतर शिवसेनेची स्थापना करत असल्याची घोषणा केली होती. शिवसेना आणि शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा हे एक समीकरण बनलं होतं. गेल्या पाच दशकांपासून शिवाजी पार्कवरील सेनेचा दसरा मेळावा असं समीकरण होतं.

गेल्या दोन वर्षांपासून करोना संसर्ग असल्यानं २०२० मध्ये ऑनलाइन पद्धतीनं दसरा मेळावा झाला होता. तर, २०२१ ला सायनच्या ष्णमुखानंद सभागृहात ५० टक्के उपस्थितीसह दसरा मेळावा पार पडला होता.

मोठी बातमी: ज्या प्रकरणात राऊत जेलमध्ये, त्याच प्रकरणी पवारांची चौकशी करा, फडणवीसांना पत्र

शिवसेनेच्यावतीनं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून २२ ऑगस्टला मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यात आला. तर, ३० ऑगस्टला शिंदे गटाचे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून अर्ज दाखल केला. मुंबई महापालिकेकडून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य मिळेल असे संकेत मिळताच बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी एमएमआरडीएच्या बांद्रा कुंद्रा कॉम्प्लेक्समधील मैदानासाठी अर्ज केला. शिंदे गटानं शिवाजी पार्कवरील मेळाव्याला परवानगी नाही मिळाली तर दुसरा पर्याय मिळावा म्हणून बीकेसी मैदानासाठी अर्ज केल्याचं सांगितलं.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी अखिल भारतीय कामगार सेनेकडून बीकेसीतील मैदानासाठी अर्ज केला. एमएमआरडीएकडून शिंदे गटाला परवानगी देत अरविंद सावंत यांचा अर्ज फेटाळण्यात आला.

अशोक चव्हाणांचा प्रस्ताव पृथ्वीबाबांना अमान्य, राहुल गांधींच्या बिनविरोध निवडीस आक्षेप

शिवसेनेकडून दबाव वाढवण्याचा प्रयत्न

शिवसेना खासदार अनिल देसाई आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महापालिकेनं जर परवानगी दिली नाही तर शिवाजी पार्कमध्ये घुसून दसरा मेळावा घेऊ, असा इशारा देत दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवतीर्थावर दसरा मेळावा; मिलिंद वैद्यांची पालिकेत धडक; परवानगीबाबत अधिकारी म्हणाले…

सामोपचाराने घ्या, शिवतीर्थासाठी कायम आक्रमक असणारे अरविंद सावंत मवाळSource link

Leave a Reply

Your email address will not be published.