उल्हासनगर, ठाणे : उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक पाच परिसरात ओटी चौकात ( Building Slab Collapse In Ulhasnagar ) असलेले मानस टॉवर या इमारती पाचव्या मजल्याचा स्लॅब हा चौथ्या, तिसरा असा करत थेट जमीन दोस्त झाला. या घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. आज दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

अजूनही अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांकडून येथे शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. या दुर्घटनेत ढोलनदास धनवाणी, सागर ओचानी, रेणू धनवाणी आणि प्रिया धनवाणी या चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक अज्ञात व्यक्ती जखमी आहे. त्याच्यावर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dombivli Wall collapsed : रेल्वेची भिंत बांधण्याचं काम सुरु होतं, भिंतीचा काही भाग कोसळला, २ जणांचा जागीच मृत्यू

दरम्यान, १८ तारेला साई दर्शन या इमारतीमध्ये स्लॅबचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. यापूर्वीही उल्हासनगरमध्ये अशा घटना घडल्या आहेत. अजूनही इमारतीचे स्लॅब कोसळण्याचा सत्र सुरूच आहे. त्यामुळे असे प्रकार थांबरणार कधी? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Shiv Sena : भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याविरोधात शिंदे-ठाकरे गट एकसाथ?, आता शिवसेनेची घणाघाती टीकाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.